बैल पोळा-तान्हा पोळ्यातून नन्ही श्रीनिकासाठी मदतीचा हात; वीर मित्र बजरंग मंडळाच्या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 






बैल पोळा-तान्हा पोळ्यातून नन्ही श्रीनिकासाठी मदतीचा हात; वीर मित्र बजरंग मंडळाच्या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

◾९६,६००० हजार रुपयांची आर्थिक मदत


एक हाथ मदद का  नन्ही श्रीनिका के लिए उम्मीद की किरण बनें

बल्लारपूर,( Rajya Reporter News ) : बल्लारपूर शहरातील वस्ती विभागात बैल पोळा व तान्हा पोळा या सणाच्या दोन दिवसांत एसएमए टाईप-२ ( Spinal Muscular Atrophy Type-2 ) या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या कामठी, जिल्हा नागपूर येथील चिमुकली श्रीनिका रोहित माकडे हिच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला वीर मित्र बजरंग मंडळ, महात्मा गांधी वॉर्ड तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मानवतेचा आदर्श निर्माण केला.

श्रीनिकाच्या उपचारासाठी मोठ्या आर्थिक रकमेची आवश्यकता असल्याने तिच्या मदतीसाठी वीर मित्र बजरंग मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी बैल पोळा आणि तान्हा पोळ्याच्या काळात नागरिकांशी संपर्क साधून आर्थिक मदतीचे आवाहन केले. मंडळाच्या या सामाजिक उपक्रमाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या परीने आर्थिक योगदान दिले.

या उपक्रमातून तब्बल ९६,६००० हजार रुपयांची आर्थिक मदत जमा झाली. जमा झालेली ही रक्कम कामठी येथे श्रीनिकाच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यात आली. या मदतीमुळे श्रीनिकाच्या उपचारासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठा हातभार लागला आहे.

या समाजोपयोगी उपक्रमासाठी राकेश मूलचंदानी, प्रीतम नांदेकर, प्रीतम दाडे, स्वप्निल भोपये, विकास धंदरे, स्वप्नील गोहणे, संजय धंदरे, गौरव पंडिलवार, निलेश शिंगाने, कृष्णा कांगरे, मंगेश डोडरे, अभिषेक मेदाले, मोरेश्वर शिवरकर, प्रज्वल बोरकुटे, राहुल किरणामे, ओम गोंदे, विजय नांदुरकर, सुजल बोरकर, सुजल धोडरे, सुजित धंदरे, गौरव धोडरे, साहिल कोल्हे, प्रमोद ठाकूर, साहिल धोडरे, आयरन चिताडे, गजानन शेरकी, सुजित धदरे, शुभम धादरे, प्रेम बनोडिया, सहदेव कोतपल्लीवार, वेदान्त सातपुते, तुषार इस्मवार, सुरज कवलकर, सिद्धांत यादव, प्रकाश लिंगमवार आणि कार्तिक लोखंडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

‘समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या परीने केलेली छोटीशी मदत एखाद्या गरजूच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकते,’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.



Post a Comment

0 Comments