चंद्रपूर जिल्ह्यात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वसुमना पंत

 



चंद्रपूर जिल्ह्यात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वसुमना पंत


◾पदवीधर मतदानाच्या दिवशी 23 ऑक्टो. रोजी मद्यविक्री बंद


चंद्रपूर,( Rajya Reporter News ) :  नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 23 ऑक्टोबर 2026 रोजी होत असल्याने मतदानाच्या संपूर्ण दिवशी (23 ऑक्टो) चंद्रपूर जिल्ह्यात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नमुना सीएल-2, सीएल-3, एफएल-1, एफएल-2/सीएल/एफएल/टिओडी-3, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल-4, एफएल/बीआर-2, टड – 1 या अनुज्ञप्त्या 23 ऑक्टोबर रोजी संपूर्ण दिवस बंद राहील, याची सर्व अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.



Post a Comment

0 Comments