बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तान्हा पोळा नंदी सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण सोहळा उत्साहात
बल्लारपूर,( Rajya Reporter News ) : बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तान्हा पोळा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या नंदी सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण सोहळा शुक्रवार, दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमाला बालगोपालांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमासाठी अल्पसंख्याक काँग्रेस शहर अध्यक्ष इस्माईल ढाकावाला, ओबीसी काँग्रेस शहर अध्यक्ष गणपत ईंटकर, माजी नगरसेवक अशोक चितळे, अनुसूचित जमाती विभागाचे अध्यक्ष नितीन सोयाम, संजय झिलेवार तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाला नगराध्यक्षा सौ. डॉ. अल्का अनिल वाढई तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूरचे संचालक डॉ. अनिल सदाशिव वाढई यांची विशेष उपस्थिती लाभली.
नंदी सजावट स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ पत्रकार वसंतजी खेडेकर, श्रावण बनासुरे, मनीष कायरकर, प्रवीण विघ्नेश्वर आणि दर्शना मोगरे यांनी केले. परीक्षकांनी सहभागी बालगोपालांच्या कलाकौशल्याची पाहणी करून उत्कृष्ट सजावटींची निवड केली.
यावेळी उपाध्यक्ष देवेंद्र आर्या, शहर अध्यक्ष अब्दुल करीम शेख, नरेश मुंदडा, चंद्रपूर जिल्हा वाहतूक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक धोपटे (जिल्हा कार्यवाह) यांच्यासह नगरसेवक भास्कर माकोडे, शारदा माकोडे, वैशाली हुमने, वैश्नवी जुमडे, अंकू बुक्के, गणपत ईंटकर, नितीन सोयाम, नरेश आनंद, मोना धनोरकर, संजय वटाणे, महमूद खान पठाण, बाबू भाई, करण कामठे, अशोक चिताडे तसेच काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान नंदी सजावटीची पाहणी करण्यात आली. सहभागी बालगोपालांचे कौतुक करून त्यांना टिफिन बॉक्सचे वितरण करण्यात आले. तसेच स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्या बालगोपालांना सायकलींचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्षा डॉ. अल्का वाढई यांनी तान्हा पोळ्यासारखे पारंपरिक सण हे आपल्या संस्कृती आणि परंपरेचे जतन करणारे माध्यम असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे लहान मुलांना आपल्या संस्कृतीची आणि परंपरांची ओळख होते तसेच ती पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी नंदी सजावट स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व बालगोपालांचे कौतुक करून विजेत्यांचे अभिनंदन केले.
बालगोपालांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.








0 Comments