कोठारीतील शांततापूर्ण ठिय्या आंदोलनाला शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांची भेट

 





कोठारीतील शांततापूर्ण ठिय्या आंदोलनाला शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांची भेट

◾ग्रामपंचायतीच्या चौकशीसह ग्रामसभा घेण्याची प्रमुख मागणी


बल्लारपूर,( Rajya Reporter News ) : ग्रामपंचायतीच्या विविध प्रश्नांबाबत चौकशी करण्यात यावी तसेच ग्रामसभा घेण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी कोठारी येथे सुरू असलेल्या शांततापूर्ण ठिय्या आंदोलनाला शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी ग्रामपंचायतीशी संबंधित विविध प्रश्न, नागरिकांच्या मागण्या तसेच प्रलंबित विषयांबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. ग्रामपंचायतीच्या कामकाजाची योग्य चौकशी करून नागरिकांसमोर वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.

संदीप गिरे यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. नागरिकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

या भेटीप्रसंगी घनश्याम मूलचंदानी, चंद्रपूर महानगरपालिका गटनेते राहुल विरुडकर, तालुका अध्यक्ष प्रकाश पाठक, प्रशांत मेश्राम, सचिन तोटावार, युसूफ भाई, सरफराज भाई, सुरेश चाहरे, अखिल गेडाम, संजय खाडीलकर, साईनाथ आदे, विजय वासमवार, संजय मेडीवार, आशीष भटारकर, राजू वाढरे, विनोद देवालकर, चंद्रकांत राजूरकर, आशीष बोंडे, वसीमभाई, गणेश इजगी रवार, वैभव राजूरकर, मोरेश्वर लोहे, सुरेश बाप्पणवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments