चंद्रपूर–गडचिरोली स्थानीय लोकाधिकार सेनेचा स्थापना सोहळा उत्साहात संपन्न

 




चंद्रपूर–गडचिरोली स्थानीय लोकाधिकार सेनेचा स्थापना सोहळा उत्साहात संपन्न

◾गोमती पाचभाई यांची अध्यक्षपदी, अॅड. संदीप धानोरकर यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती 

चंद्रपूर,( Rajya Reporter News ) : स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर–गडचिरोली स्थानीय लोकाधिकार सेना यांचा स्थापना सोहळा रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी चंद्रपूर येथे स्वर्गवासी दादासाहेब कन्नमवार स्वभाव सभागृह चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक येथे मोठ्या उत्साहात व उत्स्फूर्त वातावरणात संपन्न झाला. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रेरणेने तसेच स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे अध्यक्ष माजी खा. गजाननजी कीर्तिकर, कार्याध्यक्ष खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आ. डॉ. मनीषाताई कायंदे, आ. कृपाल तुमाने व हर्षलदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्थापना सोहळा आयोजित करण्यात आला. महासंघाचे सरचिटणीस श्री. अरुणजी मोरे व शिवसेना वैद्यकीय आघाडीचे जिल्हाप्रमुख ॲड. अभय वांढरे यांच्या  उपस्थितीत हा स्थापना सोहळा पार पडला.

या स्थापना सोहळ्यादरम्यान गोमती शारदा मनोहर पाचभाई यांची चंद्रपूर–गडचिरोली स्थानीय लोकाधिकार सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच अॅड. संदीप अरुण धानोरकर यांची कार्याध्यक्षपदी, अॅड. मृणालिनी चंद्रप्रकाश रागीट यांची कोषाध्यक्षपदी, इंजिनीयर प्रशांत कोपुला यांची चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी तर श्री. मनोज तुलाराम कांबळी यांची गडचिरोली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे अध्यक्ष तथा माजी खासदार मा. गजाननजी कीर्तिकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्थापना सोहळ्यास उपस्थिती दर्शवून उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अमूल्य मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून चंद्रपूर–गडचिरोली जिल्ह्यात स्थानीय लोकाधिकार सेनेचे संघटन अधिक मजबूत करून स्थानिक युवक, बेरोजगार, कामगार व सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्याची प्रेरणा उपस्थितांना मिळाली.

यावेळी मा. आ. डॉ. मनीषाताई कायंदे व मा. आ. हर्षलदादा शिंदे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. उपस्थित सदस्यांमध्ये अॅड. संदीप अरुण धानोरकर, इंजि. प्रशांत कोपुलवार, डॉ. आशिष मारोतराव आसुटकर, अॅड. मृणालिनी चंद्रप्रकाश रागीट, श्री. महेश लक्ष्मीकांत आक्केवार अॅड. प्रशांत मनोहरराव गिरडकर, इंजि. अभिजीत गजानन खडसे, श्री. मनोज तुळाराम कांबळी, श्री. संभाजी किसन येरगुडे, श्री. मयूर मनोहर पाऊणकर,श्री. बंडू पांडुरंग पहनपटे, श्री. स्वामी चंद्रप्रकाश रागीट, श्री. कोमल हरिदास मोहितकर, श्री. महेश दिलीप चीतारकर, श्री. सुभाष पानघाटे आणि श्री. सचिन थिपे यांचा समावेश होता.

“चंद्रपूर–गडचिरोलीतील स्थानिक युवक, बेरोजगार आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी स्थानीय लोकाधिकार सेना सदैव कार्यरत राहील.

स्थानिकांना रोजगार, व्यवसाय आणि विकासाच्या संधी मिळवून देण्यासाठी संघटितपणे प्रभावी लढा उभारू.

जनतेचा विश्वास हीच आमची ताकद असून, तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करू.”




Post a Comment

0 Comments