बरांज कोळसाखाण प्रकल्पसंबंधी डिसें. २०१६ चे कराराचे अंमलबजावणीकरिता कर्नाटक मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन करावे - हंसराज अहीर

 



बरांज कोळसाखाण प्रकल्पसंबंधी डिसें. २०१६ चे कराराचे अंमलबजावणीकरिता कर्नाटक मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन करावे - हंसराज अहीर 

◾मुख्यमंत्र्यांना हंसराज अहीर यांची विनंती.

नागपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) :  महाराष्ट्र शासन, कर्नाटकचे ऊर्जामंत्री व कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमी. (KPCL) दरम्यान दि. १५/१२/२०१६ रोजी झालेल्या कराराचा भंग करीत केपीसीएल भूमीअधिग्रहण, गावांचे पुनर्वसन व प्रकलग्रस्तांना मोबदला आदीबाबत टाळाटाळ करून कोळशाचे उत्खनन करीत असल्याने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन प्रकल्पग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना न्याय देण्याकरिता राज्य सरकारने कर्नाटक सरकार व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात प्रत्यक्ष भेट घेऊन केली.

दि. ०७ जून २०२६ रोजी हंसराज अहिर यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची नागपूर येथील शासकीय कार्यालयात भेट घेऊन केपीसीएलच्या मनमानी व शेतकरी विरोधी धोरणाविषयी सविस्तर चर्चा केली. आपल्या कार्यकाळात महाराष्ट्र शासन व केपीसीएल यांच्यात कोळसा खाण सुरु होण्यापूर्वी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, भूमीअधिग्रहण व पुनर्वसन विषयक समस्या मार्गी लावण्याकरिता दि.१५ डिसेंबर २०१६ रोजी करार झालेला होता परंतु या कराराचा भंग करीत केपीसीएलने करारानुसार प्रत्यक्ष कार्यवाही न करता कोळसा उत्खनन सुरु केले आहे त्यामुळे बरांज, मोकासा, सोमनाळा, बोनथाळा, किलोनी, कोढोली, चिचोर्डी या भद्रावती तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत आहे. या सर्व गावातील एकूण १४५७ हेक्टर जमीनीचे अधिग्रहण तसेच चेकबरांज व बरांज मोकासा या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरी आहेत व अनेक समस्या अजूनही प्रलंबित आहेत याकडेही अहीर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन केपीसीएलला सन २०१६ मध्ये झालेल्या कराराची अंमलबजावणी करण्याकरिता आपल्या अध्यक्षतेखाली कर्नाटकचे मुख्यमंत्री व केपीसीएल सोबत बैठकीचे आयोजन करून प्रकल्पग्रस्त शेतकरी व संबंधित गावांतील ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी अहीर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना या भेटीदरम्यान केली. मा. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन अहीर यांना दिले. दरम्यान हंसराज अहिर यांनी विधानपरिषद निवडणुकीत मिळत असलेल्या यशाबद्दल मा.मुख्यमंत्री महोदयांचे अभिनंदन केले.






Post a Comment

0 Comments