सलग सर्वाधिक ऐतिहासिक कार्यकाळाबद्दल पंतप्रधानांना शुभेच्छा
◾मंदिरांमध्ये पुजाअर्चा व महाआरतीद्वारा मोदीजींच्या दीर्घायुष्याकरिता प्रार्थना
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्यूज ) : देशात तब्बल 12 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून सुशासनपर्व प्रस्थापित करणारे दूरदृष्टीचे, प्रखर राष्ट्रवादी नेतृत्व प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदीजी यांनी सुमारे 4399 दिवसांचा सलग कार्यकाळ पूर्ण करीत नवा इतिहास घडविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करीत त्यांच्या दीर्घायुष्याकरिता दि. 10 जून 2026 रोजी भाजप, भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी विविध मंदिरात पुजाअर्चा, महाआरती करून त्यांच्या दीर्घायुरारोग्यासाठी प्रार्थना केली व प्रधानमंत्र्यांना पुढील यशस्वी कार्यकाळाच्या शुभेच्छा दिल्या.
पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहीर व आमदार किशोरजी जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष, युवानेते रघुवीर अहीर यांच्या विशेष पुढाकारातून भाजपा, भाजयुमो व पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमामध्ये उत्सफुर्त सहभाग घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची राजकीय वाटचाल सामान्य कार्यकर्ता म्हणून झाली असली किंवा ते स्वतःला लोकसेवक समजत असले तरी लोकसेवक ते विश्वनेत्यापर्यंत त्यांनी घेतलेली झेप ही अफाट परिश्रम, महान कर्तृत्व, वेधक दूरदृष्टीचे द्योतक आहे. देशाच्या प्रगतीकरिता व देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी मोदींचे नेतृत्व काळाची गरज असल्याची भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.
चंद्रपूरच्या आराध्य दैवत माता महाकाली मंदिर तसेच शनि मंदिर येथे पूजाअर्चणा करून मसालाभात व डब्बे वाटप करण्यात आले यावेळी प्रधानमंत्र्यांना उपस्थितांनी शतायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. चिमुर येथील सुप्रसिध्द श्रीहरी बालाजी देवस्थान येथे रघुवीर अहीर व शामल अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी पुजा, अर्चना करून मोदीजींच्या निरामय स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली. सर्वाधिक काळ सलग देशसेवा करून सुशासन पर्वाला नवी दिशा दिल्याबद्दल उपस्थितांनी मोदीजींचे आभार मानले.
यावेळी भाजपा चिमुर यांच्या वतीने राजु देवतळे, मनिष तुमपल्लीवार व इतरांनी रघुवीर व शामल अहीर यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन तर देवस्थानच्या वतीने महावस्त्र व भगवान श्री बालाजींची प्रतिमा देऊन आदरातिथ्य करण्यात आले. चंद्रपूर येथील विठ्ठल मंदिर वार्डातील गणपती मंदिरात मोदीजींच्या दीर्घायुष्याकरिता महाआरतीचे आयोजन करून प्रार्थना करण्यात आली. त्यांच्या ऐतिहासिक सर्वाधिक सेवाकाळाबद्दल नागरिकांना लाडूचे वाटप करण्यात आले.
चिमुर येथील कार्यक्रमात सर्वश्री चिमुर न.प. उपाध्यक्ष संजय नवघरे, न.प. सभापती कुणाल कावरे, भाजयुमो अध्यक्ष आकाश वनकर, प्रशांत चिडे, रमेश कंचर्लावार, सुभाष केमये, भुसारी जी व कुंदन केळझरकर यांची उपस्थिती होती तर गणपती मंदिर येथील महाआरतीस राजु घरोटे, भालचंद्र दानव, सुभाष आदमने, पूनम तिवारी, गौतम यादव, जगदीश दंडेले, प्रतिक शिवणकर, सलीम शेख, विमलताई कातकर, राजु येले, आशा फुलझेले व बंगाली कॅम्प येथील काली माता मंदिरातील महाआरतीस तुषार सोम, विश्वजीत शहा व अनेक भाजप कार्यकर्ते तसेच मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.








0 Comments