इयत्ता 11 वी विज्ञान शाखेतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

 



इयत्ता 11 वी विज्ञान शाखेतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

◾नीट, जेईई व सीईटी प्रवेश परीक्षा मार्गदर्शनासाठी अर्ज मागविले

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी नंतर नामांकित खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने नीट,  जेईई व सीईटी प्रवेश परीक्षा मार्गदर्शन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या योजनेसाठी 12 जुलै 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता शासकीय आश्रमशाळा, बोर्डा येथे द्वितीय चाळणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेच्या निकालानुसार नीट,  जेईई व सीईटी प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये 40 टक्के विद्यार्थी शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधून, 30 टक्के विद्यार्थी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमधून आणि 30 टक्के विद्यार्थी शासकीय, खाजगी व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांमधून निवडले जाणार आहेत.

इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या व प्रशिक्षणासाठी इच्छुक असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज 2 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या कार्यालयात सादर करावेत. तसेच अर्जाची माहिती कनिष्ठ लिपिक राहुल गोंडाणे यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांक ९०४९३३८७१३ वरही पाठविता येईल, असे आवाहन प्रकल्प अधिकाऱ्यांनी केले आहे.

अर्जासोबत इंग्रजीमध्ये विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, आईचे नाव, सध्या प्रवेशित शाळेचे नाव, जन्मतारीख, जातीचे नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक व संपूर्ण पत्ता ही माहिती सादर करणे आवश्यक आहे.




Post a Comment

0 Comments