माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ संविधानाच्या प्रस्तावनेचे वितरण आणि एसआयआर शिबिर

 



माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ संविधानाच्या प्रस्तावनेचे वितरण आणि एसआयआर शिबिर

बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दि.२१/०५/२०२६ रोजी माजी पंतप्रधान आणि संगणक क्रांतीचे जनक, दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त, विद्या नगर येथील त्रिशरण बुद्ध विहारच्या प्रांगणात संविधानाच्या प्रस्तावनेचे वितरण आणि एसआयआर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यक्रमात नगर परिषद अध्यक्षा डॉ. अलका वाढई, तहसीलदार श्रीमती रेणुका कोकाटे, मुख्य अधिकारी विशाल वाघ, नगर परिषद उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, शहर काँग्रेस अध्यक्ष अब्दुल करीम, नगरसेविका श्रीमती मोना धानोरकर, बँक संचालक डॉ. अनिल वाढई, कैलाश धानोरकर, त्रिशरण बुद्ध विहारचे अध्यक्ष संदीप मेश्राम, महिला मंडळाच्या अध्यक्षा कविता जुमडे, माजी नगरसेवक गणेश कोकाटे आणि प्राध्यापक विनय कावडे प्रमुखा ने उपस्थित  होते.

या प्रसंगी दादाभाई नौरोजी वार्ड व महाराणा प्रताप वार्डातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मतदार यादीच्या विशेष, सखोल पुनरिक्षणासाठी दोन्ही प्रभागातील बीएलओ उपस्थित होते.

शिबिर यशस्वीतेसाठी राजू मारमवार, समय्या जक्कू, संदेश दहेगावकर, शुभम दिवसे, गणेश चौहान, अशोक दंडलवार, जयराज ढेकळे, रशीद शेख, धर्मा महाकाली, राकेश शिवणकर, मुकेश दंडू, आदींनी सहकार्य केले.




Post a Comment

0 Comments