उप पोलीस स्टेशन लाठी हद्दीतील मौजा सोनापूर येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्हयाचा २४ तासात छडा लावण्यात पोलीसांना यश

 



उप पोलीस स्टेशन लाठी हद्दीतील मौजा सोनापूर येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्हयाचा २४ तासात छडा लावण्यात पोलीसांना यश

◾एकुण १,७८,२५०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ची कामगिरी

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : उप पोलीस स्टेशन लाठी अंतर्गत येणाऱ्या सोनापूर येथे नुकतीच एक घरफोडीची घटना घडली होती. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व पोलीस स्टेशन लाठीच्या पथकाने संयुक्तरित्या तपास चक्र गतीने फिरवले. आधुनिक तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी तेलंगणा राज्यात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने पथक रवाना करून आरोपी आशिष जानकीराम चौधरी, वय २६ वर्षे, रा. सोनापूर देशपांडे, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर ला २४ तासांच्या आत तेलंगणातून ताब्यात घेवुन गुन्हा उघडकीस आणण्यास यश आला आहे.

सदर आरोपीला विश्वासात घेवुन गुन्हयासंबधाने विचारपुस केली असता त्याचे कडुन खालील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहे.

१) पोलीस स्टेशन लाठी अपराध क्र.४२/२६ कलम ३०५ (a), ३३१ (४) BNS या घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या रक्कमेपैकी १,६३, २५०/- रुपये नगदी आणि चोरीच्या पैशांतून खरेदी केलेले १५,०००/- रुपये किमतीचे २ मोबाईल फोन असा एकूण १,७८, २५०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

२) पोलीस स्टेशन गोंडपिपरी अपराध क्र. २५२/२४ कलम ३०३ (२) BNS या घरफोडीच्या गुन्ह्यासाठी आरोपीने वापरलेली बाईक ही गोंडपिपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपीला पुढील कायदेशीर तपासासाठी पोलीस स्टेशन लाठी यांच्या ताब्यात देण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील सखोल तपास लाठी पोलीस करीत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे स्थानिक गुन्हे शाखाा चंद्रपूर यांचे नेतृत्वात सपोनि दीपक काँक्रेटवार, सपोनि बलराम झाडोकार, स. फौ. स्वामीदास चालेकर, पोहवा अजय बागेसर, पो.अं.गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, चापोअ ऋषभ बारसिंगे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि पोलीस स्टेशन लाठीचे पोहवा अशोक मंजुळकर यांच्या पथकाने केली आहे.




Post a Comment

0 Comments