चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची विशेष बैठक

 



चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची विशेष बैठक

◾सर्व २७ नगरसेवकांना अधिकृतरीत्या नोटीस जारी

◾ काँग्रेस गटनेत्याकडून बोलण्यात आलेली अधिकृत विशेष बैठक संपन्न विविध विषयांवर चर्चा

 चंद्रपुर,( राज्य रिपोर्टर न्यूज ) : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची विशेष बैठक आज रविवार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीसंदर्भात सर्व २७ नगरसेवकांना अधिकृतरीत्या नोटीस जारी करण्यात आली होती. तसेच व्हॉट्सॲप संदेश व लेखी पत्राद्वारेही सर्व नगरसेवकांना बैठकीची माहिती देण्यात आली होती.

आज झालेल्या बैठकीला गटनेते राजेश अडूर यांच्यासह सचिन कात्याल, वसंत देशमुख, चंदाताई वैरागडे, विनोद लाभाने, वैशाली चंदनखेडे, अभिषेक डोहोफोडे, अनिता चोखे, करिश्मा जंगम आणि सफिया तवंगार खान हे नगरसेवक प्रत्यक्ष उपस्थित होते. तर नगरसेविका संजीवनी वासेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभाग नोंदविला.

बैठकीदरम्या नमहानगरपालिकेतील विविध  विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत परिस्थितीवरही उपस्थित सदस्यांनी विचारमंथन केले.

बैठकीत गटनेत्यांनी अधिकृतपणे नोटीस जारी करून बोलावलेल्या या बैठकीस अनुपस्थित राहिलेल्या नगरसेवकांबाबत गंभीर चर्चा करण्यात आली. पक्षशिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित नगरसेवकांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याबाबतचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

दरम्यान, काही नगरसेवकांच्या गटाकडून उद्या स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती समाजमाध्यमांच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. ही बैठक पूर्णपणे नियमबाह्य, अवैध व असंवैधानिक असून तिचा काँग्रेस पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी अशा बैठकीपासून दूर राहावे, असे आवाहन अधिकृत गटनेत्याकडून करण्यात येत आहे. 





Post a Comment

0 Comments