शिक्षणासाठी घरापासून लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार!
◾मूल येथील १०० मुलींच्या, तर भिवकुंड येथील २०० मुलांच्या वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्याकडे आ.मुनगंटीवार यांचा पत्राद्वारे आग्रह
◾ मूल व भिवकुंड येथील दोन शासकीय वसतिगृहांसाठी जमीन उपलब्ध करून देण्याची आ. सुधीर मुनगंटीवार यांची आग्रही मागणी
चंद्रपूर,( Rajya Reporter News ) : शिक्षणाच्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यांत उज्ज्वल भविष्याची स्वप्ने असतात; मात्र घरापासून दूर राहून शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन आणि अभ्यासाची व्यवस्था ही अनेकदा मोठी चिंता ठरते. परिस्थितीच्या मर्यादांमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, त्याच्या स्वप्नांना निवाऱ्याअभावी माघार घ्यावी लागू नये, या संवेदनशील भूमिकेतून राज्याचे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. मूल येथे १०० विद्यार्थिनींसाठी आणि बल्लारपूर तालुक्यातील भिवकुंड येथे २०० विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित शासकीय वसतिगृहांना जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्याकडे केली आहे. या वसतिगृहांमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास, भोजन आणि शांतपणे अभ्यास करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडणार आहे.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मूल येथील १०० विद्यार्थिनींच्या आणि बल्लारपूर तालुक्यातील भिवकुंड येथील २०० विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहांसाठी जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्याकडे केली आहे. मूल येथील वसतिगृहासाठी ३.२१ एकर, तर भिवकुंड येथील वसतिगृहासाठी ०.११ एकर शासकीय जमीन तातडीने उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
घरापासून दूर राहून शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी निवास आणि भोजनाची व्यवस्था हा त्यांच्या पालकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असतो. शिक्षणासाठी घराबाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना राहण्याची, जेवणाची आणि शांतपणे अभ्यास करण्याची सोय उपलब्ध झाली, तर त्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील अनेक अडचणी दूर होऊ शकतात. याच दृष्टीने मूल येथे १०० विद्यार्थिनींसाठी आणि भिवकुंड येथे २०० विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह उभारण्याकरिता जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या वसतिगृहांमुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा मिळण्यास मदत होईल, तसेच आपल्या पाल्याच्या निवासाची आणि भोजनाची चिंता करणाऱ्या पालकांनाही मोठा दिलासा मिळू शकेल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक परिस्थितीचा अडसर ठरू नये, या संवेदनशील भूमिकेतून आ.मुनगंटीवार यांनी विषयाला प्राधान्य दिले आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला सामाजिक परिस्थितीची मर्यादा पडू नये आणि आर्थिक अडचणींमुळे गुणवंत विद्यार्थ्यांच्या संधी हिरावल्या जाऊ नयेत, या भूमिकेतून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रश्नाला प्राधान्य दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






0 Comments