पदवीधर मतदार संघासाठी चंद्रपूर जिल्ह्यात 72.59 टक्के मतदान
◾नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक
चंद्रपूर,( Rajya Reporter News ) : नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात 72.59 टक्के मतदान झाले.
शुक्रवारी (दि. 23) सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 23419 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 32262 मतदार असून
पुरुष मतदारांची संख्या 20905 तर स्त्री मतदार 11357 आहे.
जिल्ह्यातील 58 मतदान केंद्रावर झालेल्या या निवडणुकीत 15842 पुरुष मतदारांनी (75.78 टक्के), 7577 स्त्री मतदारांनी (66.72 टक्के) मतदान केले. ही टक्केवारी 72.59 आहे.





0 Comments