किराणा व्यावसायिक नीरज रामसेवक साहू यांचे निधन
बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्यूज ) : राणी लक्ष्मीबाई वॉर्ड, बल्लारपूर येथील रहिवासी व किराणा दुकानाचे व्यावसायिक नीरज रामसेवक साहू वय ५० वर्षे यांचे नागपूर येथे उपचारादरम्यान बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता निधन झाले.
काही महिन्यांपासून त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक व परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.
त्यांची अंत्ययात्रा गुरुवार दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता त्यांच्या राहत्या निवासस्थानावरून, राणी लक्ष्मीबाई वॉर्ड, रेल्वे ब्रिज, बस्ती विभाग, बल्लारपूर येथून स्मशानभुमी निघणार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व शोकाकुल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.








0 Comments