बल्लारपूर तालुक्यातील कोठारी गावात ठिय्या आंदोलनाला यश; मागण्या मान्य
◾BDO धनंजय साळवे यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे
बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारपूर तालुक्यातील कोठारी गावात विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या शांततापूर्ण ठिय्या आंदोलनाला अखेर यश आले असून, प्रशासनाकडून मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गट विकास अधिकारी धनंजय साळवे यांची भेट घेऊन आंदोलनातील मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी प्रशासन व आंदोलनकर्त्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.
या चर्चेनंतर आंदोलनातील मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी ५ ऑक्टोबर किंवा १२ ऑक्टोबर रोजी ग्रामसभा घेण्यात येईल, असे आश्वासन गट विकास अधिकारी धनंजय साळवे यांनी दिले. प्रशासनाकडून मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पडले. प्रशासनाने मागण्यांबाबत दिलेल्या आश्वासनामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आगामी ग्रामसभेत संबंधित मागण्यांवर सविस्तर चर्चा होऊन त्यावर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
या आंदोलनावेळी आशिष बोंडे, विनोद देवाडकर, आशिष भाटारकर, राजू वांडरे, गणेश इजगिरवार, चंद्रकांत राजूरकर, वैभव राजूरकर, शुभम भुरेवार, मोरेश्वर लोहे, शुभम खोब्रागडे, आकाश देठे, योगेश जानगले, अजय खोब्रागडे, पवन बामणे, अमर भोयर, प्रणय कावरे, रंजीत बांबोडे, स्वप्नील ढवस यांच्यासह अनेक आंदोलनकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच घनश्याम मूलचंदानी (माजी नगराध्यक्ष), राहुल विरुटकर (महानगरपालिका गटनेते), सतीश भिवगडे, विनोद यादव (बल्लारपूर नगर परिषद गटनेते), प्रकाश पाठक, प्रशांत मेश्राम, सचिन तोटावार, युसूफभाई, मीनाक्षी गलघट, सुरेश बप्पनवार, विनोद बुरानडे यांच्यासह शिवसैनिक व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आल्याने आता ५ किंवा १२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेकडे कोठारी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.







0 Comments