बल्लारपूर नगर परिषद एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी शब्बीर अली
◾उपाध्यक्षपदी नरेश गेडाम, तर मानद सचिवपदी संगीता उमरे यांची बिनविरोध निवड
बल्लारपूर,( Rajya Reporter News ) : बल्लारपूर नगर परिषद एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., रजिस्ट्रेशन क्रमांक 829 च्या पदाधिकारी निवडणुकीची प्रक्रिया मंगळवार, दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी सोसायटीच्या कार्यालयात पार पडली. या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष व मानद सचिव या तिन्ही पदांवर बिनविरोध निवड करण्यात आली.
यामध्ये श्री. शब्बीर अली, स्वच्छता निरीक्षक, नगर परिषद बल्लारपूर यांची सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच कुमारी संगीता गजानन उमरे, उपमुख्य अधिकारी, नगर परिषद बल्लारपूर यांची मानद सचिवपदी, तर श्री. नरेश गेडाम, स्वच्छता निरीक्षक यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
सोसायटीच्या पदाधिकारी निवडणुकीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी संचालक मंडळातील श्री. तेजबहादूर थापा, श्री. मल्लेश कुपलवार, श्री. अब्दुल रशीद, श्री. प्रशांत बटघरे, श्री. शंकर तांड्रा व कुमारी रीना बहोत यांनी विशेष प्रयत्न केले.
निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. पानाते, सहाय्यक AR कार्यालय, बल्लारपूर यांनी कार्यभार पाहिला. तसेच श्री. येवले, लिपिक आणि श्री. महेश बसानवार यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व मानद सचिव यांच्या बिनविरोध निवडीबद्दल सोसायटीच्या सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
0 Comments