जयंतीदिनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन..!
◾अण्णाभाऊ हे दुःखीतांच्या व कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे महान योध्दे - राजुभाऊ येले
चंद्रपूर,( Rajya Reporter News ) : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रांतीसेना, चंद्रपूरच्या वतीने दि. 01 ऑगस्ट 2026 रोजी साहित्यभुषण अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
अण्णाभाऊ साठे क्रांतीसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा अण्णाभाऊ साठे राज्य पुरस्काराचे मानकरी राजुभाऊ येले यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या जयंती उत्सवात मातंग समाज बांधवांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहातील अण्णाभाऊंच्या अर्धाकृती पुतळ्यास मान्यवर अतिथींनी पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी राजुभाऊ येले यांनी लोकशाहीर अण्णाभाऊंच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यीक व कामगारांच्या अभुतपूर्व योगदानावर प्रकाश टाकला. दीड दिवसाच्या शिक्षणातून अण्णाभाऊंनी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिव्य विचारातून प्रेरणा घेऊन रंजल्या-गांजल्या व कश्टकऱ्यांच्या जीवनावर आधारीत साहित्य निर्मिती करून या समाजाचे दुःख, हालअपेष्ठांना वाचा फोडली. त्यांच्या साहित्यातून अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. दुःखीत व श्रमिकांच्या न्याय हक्कासाठी जीवनभर लढणारा हा महान योध्दा होता अशा शब्दात राजुभाऊ येले यांनी अण्णाभाऊंचा गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हा प्रकल्प अधिकारी अॅड. सचिन फुलझेले यांनीही अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर अत्यंत प्रेरणादायक माहिती आपल्या भाषणातून दिली. अण्णाभाऊंचे जीवन संघर्षमय राहीले परंतु, उपेक्षितांच्या उत्कर्षाकरिता ते सदैव झिजत राहीले असे विचार त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे सभागृह ते अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली व –“अण्णाभाऊ अमर रहे” अशा घोषणा देण्यात आल्या.
या कार्यक्रमास संदीप रामटेके, रमेश मडावी, मोरेश्वर वाकडे, अस्मिता वनकर, लता पगडपल्लीवार, अशोक वानखेडे, सतिश डोंगरे, अजय येले, सतिश बावणे, अनिल खंडाळे, स्वाती डोंगरे, शितल येले, शोभा बावणे, सुंदराबाई पोटफोडे, गणेश पोटफोडे, शारदा डोंगरे, रेखा डोंगरे, रिना येले, अंबिका पडघाणे, माधुरी येले, वंदना जाधव, दुर्गा डोंगरे, कोमल डोंगरे, जय डोंगरे, बजरंग वानखेडे, नेहा वानखेडे, शेखर खंडाळे, अरूण खंडाळे, आतिष डोंगरे यांचेसह शेकडो समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.







0 Comments