प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना फार मोठी संधी उपलब्ध करून दिली - हंसराज अहीर
◾वैद्यकीय महाविद्यालये व जागांमध्ये प्रचंड वृध्दी करीत विद्यार्थ्यांना संधी
चंद्रपूर,( Rajya Reporter News ) : नीट (NEET) पेपर लिक बाबत देशात चाललेले आंदोलन हे जरी लोकशाहीप्रधान देशातील जनतेचा घटनात्मक अधिकार असला तरी दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलन व त्यात सहभागी झालेले विद्यार्थी, विद्यार्थीनी व पालकवर्गांनी विरोधी पक्षांच्या चिथावणीखोर व देशात अशांतता पसरविण्याचा मनसुबा असणाऱ्या नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला असला तरी हे मात्र खरे आहे की, प्रधानमंत्री मान. मोदीजींच्या अर्थात एनडीए सरकारच्या सत्ताकाळात, युपीए सरकार व अन्य सरकारच्या तुलनेत प्रधानमंत्री मान. मोदीजींनी विद्यार्थी, विद्यार्थींनी व देशातील युवकांच्या शिक्षणाप्रतीच्या जबाबदारीत कसलीही कसर सोडलेली नाही, शैक्षणिक क्षेत्रात मोदी सरकारच्या राजवटीत केलेले कार्य बघता विद्यार्थ्यांच्या हितामध्ये मोदीजींचे प्रचंड योगदान आहे. नितिगत धोरणांची अंमलबजावणी करून त्यांनी भरीव कार्य केले आहे.
विद्यार्थ्यांना देशाचे भविष्य व केंद्रबिंदु मानून प्रधानमंत्र्यांनी देशात सर्वत्र उच्च शिक्षणाचे जाळे निर्माण केले, वैद्यकीय महाविद्यालयाच्या संख्येमध्ये मोठी भर घातली, वैद्यकीय शिक्षणाच्या जागांमध्ये प्रचंड वाढ केली. हे 12 वर्षांच्या उपलब्ध रेकॉर्डवरून स्पष्ट झाले असल्याचे पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री अहीर यांनी म्हटले असून त्यांनी तसा दावाही केला आहे.
मोदी सरकारच्या राजवटीत सन 2014-15 मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची संख्या 189 होती. त्यात वृध्दी होऊन 2026-27 मध्ये ही संख्या 441 वर पोहचली आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालय 215 वरून 382 झाली आहे. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 2014-15 मध्ये विद्यार्थ्यांच्या 25,624 सीटा होत्या, त्यात सन 2026-27 मध्ये 63,296 पर्यंत सीटांमध्ये वृध्दी झाली आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील 28,455 सीटांवरून 73,643 सीटांपर्यंत वाढ झाली आहे.
सन 2013 मध्ये युपीए सरकारच्या काळात सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नीट (NEET) परीक्षेकरिता 7,17,127 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ती मोदी सरकारच्या कार्यकाळात 2016 मध्ये 8,02,594, 2025 मध्ये 22,76,069 व 2026 मध्ये 22,79,743 पर्यंत वाढली आहे. सन 2016 ते 2026 पर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाचे संख्या 419 झाली असून व वैद्यकीय जागांमध्येही 82,860 पर्यंत वृध्दी झाली आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी मोदींचे कार्य अतुलनीय व अभूतपूर्व आहे. वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे तर, अन्य उच्च शिक्षणाच्या मोठ्या संधी त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. त्यामुळेच देशाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी सरकार म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या राजवटीचा उल्लेख करणे सर्वांनाच क्रमप्राप्त ठरेल असेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.






0 Comments