सावकारीच्या नावाखाली खंडणी आणि बेकायदेशिररित्या जमिन बळकावली

 




सावकारीच्या नावाखाली खंडणी आणि बेकायदेशिररित्या जमिन बळकावली

◾नरेश जयस्वाल यांचा पत्रपरिषदेत आरोप

 चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) :     पचमढी येथे २०१९ मध्ये देवदर्शनासाठी जात असतांना बोलेरो गाडीचा अपघात होऊन आई -वडिलांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर नागपूर येथील न्यु इराण हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यासाठी १४ लाखांचा खर्च आला. त्यासाठी नातेवाईकांनी पैसे उधार दिले.

 नातेवाईकांचे पैसे परत करण्यासाठी राजेश महाजन यांच्याकडे २५ लाखाची मागणी केली. महाजन यांनी २ टक्के प्रति महिना या व्याजाने त्याच्या भाचीच्या खात्यातून केवळ १५ लाख रुपये वळते केले. तसेच जमिन नावाने लिहून देण्याची अटही टाकली. परंतू उर्वरित १० लाख रुपये दिलेच नाही. त्यानंतर महाजन यांचे पैसे परत करण्यासाठी १२ लाखाचे कर्ज काढून प्रति महिना ५० हजार रुपये याप्रमाणे १० लाख  व ५ लाख फोन पे द्वारे असे एकूण १५ लाख रुपये परत केल्यानंतरही माझ्याकडे अवाजवी २५ लाख रुपये परत दे व जमिन माझ्यानावाने कर अशी धमकी राजेश महाजन याच्याकडून होत असून त्याच्या धमकीमुळे माझे कुटूंब दहशतीत आहे. तसेच माझे मानसिक खच्चिकरण झाले आहे.  माझ्या जीवाचे बरेवाईट झाल्यास त्याला सर्वस्वी राजेश महाजन जबाबदार राहिल असा आरोप नरेश जयस्वाल यांनी श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रपरिषदेत केला.

भद्रावती तालूक्यातील घोडपेठ येथील रहिवासी असलेले नरेश जयस्वाल यांचे आई वडिल त्यांच्या बोलेरो या वाहनाने २०१९ मध्ये देवदर्शनासाठी मध्यप्रदेश येथील पचमढी येथे गेले होते.

 तेथून परत येत असतांना त्यांच्या गाडीचा अपघात होऊन यात गाडीचे नुकसान झाले व आई वडिलांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या उपचारासाठी नागपूर येथील न्यू इराण हॉस्पिटलमध्ये अंदाजे १४-१५ लाख रुपये खर्च आला, जो सुरुवातीला माझ्या नातेवाईकांनी केला. नातेवाईकांचे पैसे परत करण्यासाठी मी राजेश महाजन यांच्याकडे २५ लाख रुपयांची मागणी २ टक्के प्रति महिना व्याजाने ५ वर्षांसाठी केली होती. त्यांनी जमीन 'कंडिशन'वर लिहून देण्याची अट घातली. मात्र, दि. १२ डिसेंबर २०१२ रोजी त्यांनी स्वतःच्या खात्यातून पैसे न देता त्यांची भाची आयुषी प्रवीण राय हिच्या खात्यातून केवळ १५ लाख रुपये दिले. 

राजेश महाजन यांनी उर्वरित १० लाख रुपये दिलेच नाहीत. उलट, नरेश जयस्वाल यांची मौजा खंडाळा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर येथील शेत जमीन (सर्व्हे नं. ६३, आराजी २.२६ हेक्टर) विश्वासाचा गैरफायदा घेऊन व कागदपत्रे वाचू न देता भाचीच्या नावे विक्रीखत करून घेतली. राजेश महाजन यांचे २ टक्के व्याजाचे पैसे देण्यासाठी जयस्वाल यांनी 'निवास बँक' कडून घोडपेट येथील घरावर १२ लाख रुपयांचे कर्ज काढले. 

त्यातून जयस्वाल यांनी  महाजन यांना प्रति महिना ५०,००० रुपये याप्रमाणे फोन पे द्वारे ५ लाख रुपये आणि रोख स्वरूपात १० लाख रुपये, असे एकूण १५ लाख रुपये (पूर्ण मुद्दल) परत केले. याव्यतिरिक्त 'फीड बँक' कडूनही जयस्वाल हे कर्ज घेऊन हप्ते भरत आहे. मुद्दल परत करूनही राजेश महाजन हे नरेश जयस्वाल यांना व्याजासाठी त्रास देत आहेत. त्यांनी दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी ३,३०,०००/- आणि दि. २९ जानेवारी २०२६  रोजी ६,६०,०००/- रुपयांची मागणी करणारे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज केले. 

तसेच घरी येऊन 'जमीन परत हवी असेल तर २५ लाख मुद्दल व १५ लाख व्याज दे आणि अडीच एकर शेती माझ्या नावे कर' अशी खंडणीवजा धमकी राजेश महाजन यांनी दिली. 

या मानसिक छळाला कंटाळून नरेश जयस्वाल यांनी दोनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु कुटुंबासाठी ते कसेबसे सावरले आहे. सध्या जमीन माझ्या ताब्यात असूनही गैरअर्जदाराने मला दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी व्हॉट्सअ‍ॅपवर १०० रुपयांच्या स्टॅम्पवर 'ठेका पत्र' लिहन देण्याबाबत दबाव टाकला आहे. 

 या सर्व घटनेमुळे महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलमान्वये गैरअर्जदारावर कठोर फौजदारी कारवाई करावी. बेकायदेशीररीत्या 'कंडिशन'वर लिहून घेतलेली माझी शेतजमीन मला परत मिळवून द्यावी, गैरअर्जदाराकडून वसूल केलेली अतिरिक्त व्याजाची रक्कम परत मिळवून द्यावी. माझ्या किंवा माझ्या कुटुंबाच्या जिवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्यास राजेश महाजन जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी अशी मागणी नरेश जयस्वाल यांनी पत्रपरिषदेतून केली आहे.




Post a Comment

0 Comments