डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बल्लारपूर पोलीस प्रशासनाच्या वतीने भव्य रूट मार्च
बल्लारपूर पोलीस रूट मार्च विडियो
बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बल्लारपूर पोलीस प्रशासनाच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चद्वारे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करत शांतता व सुव्यवस्था राखण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला.
या रूट मार्चमध्ये एकूण ६ पोलीस अधिकारी सह ६२ पोलीस कर्मचारी, होमगार्ड सैनिक सहभागी झाले होते. मार्चची सुरुवात बल्लारपूर पोलीस स्टेशन येथून करण्यात आली. त्यानंतर गोल पुलीया, महात्मा गांधी पुतळा, डॉ. आंबेडकर भवन, कॉलरी काटा गेट या शहरातील प्रमुख मार्गांवरून शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत पुन्हा पोलीस स्टेशन येथे मार्चचा समारोप करण्यात आला.
या वेळी पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, सहायक पोलीस निरीक्षक शब्बीर पठाण, पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाहा सयाम तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे यांच्यासह पोलीस अंमलदार व होमगार्ड जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रूट मार्चदरम्यान पोलीसांनी शहरातील संवेदनशील भागांची पाहणी करून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. आंबेडकर जयंती उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.








0 Comments