चंद्रपुर जिल्हयात 14 एप्रिल रोजी मद्यविक्री बंद

 





चंद्रपुर जिल्हयात 14 एप्रिल रोजी मद्यविक्री बंद

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) :  चंद्रपुर जिल्हयात 14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. सदर दिवशी कायदा सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निमित्त चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या (एफएल-१. एफएल-२,सीएल/एफएल/टिओडी-३, एफएलबिआर-२, एफएल-३. सीएल-२, सीएल-३, टड-१) 14 एप्रिल रोजी संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. सदर आदेशाचा व नियमातील तरतुदीचा जे अनुज्ञप्तीधारक भंग करतील त्यांच्याविरुध्द कडक कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक यांनी  कळविले आहे.





Post a Comment

0 Comments