राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्लेसमेंट प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 



राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्लेसमेंट प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर येथे तृतीय व चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस भरती प्रशिक्षण (CRT) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रम सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत महाविद्यालयाच्या ईआय सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना मुलाखत कौशल्य, प्रभावी संवाद कौशल्य तसेच प्लेसमेंट प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून मा. श्री. अनिल कुमार पाटील (ज्युनिअर क्लर्क) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी मुलाखतीदरम्यान आवश्यक असणाऱ्या कौशल्यांविषयी सखोल माहिती देत व्यावहारिक उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, भविष्यातील प्लेसमेंट प्रक्रियेसाठी उपयुक्त अशी महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याचे मत व्यक्त केले. हा कार्यक्रम मा. श्री. प्राचार्य डॉ. अनिल चिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

यावेळी विभाग प्रमुख स्तुती साने तसेच स्वप्निल चिताडे, संदीप जेडी, नंदकिशोर येलेट्टीवार आदी उपस्थित होते. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत झाली असून, त्यांच्या करिअर घडविण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.




Post a Comment

0 Comments