बल्लारपुर कॉलरी एंप्लाइज को ऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड बल्लारपुर चे काळबाजारीकरण

 



बल्लारपुर कॉलरी एंप्लाइज को ऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड बल्लारपुर चे काळबाजारीकरण

बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारपूर वेकोली कर्मचारी  गेल्या दोन महीन्यापासून बल्लारपुर   कॉलरी एंप्लाइज को ऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड बल्लारपुरचे गैस उपभोक्ता ग्राहक ऑनलाइन नंबर लावलेले ग्राहकांचे सिलेंडर ग्राहकाकडे डिलिव्हर न करता त्या सिलेंडर ची कालाबाजारी करीत आहे.

यामुळे ग्राहकांना गॅस सिलेंडर न मिळाल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. अशी नागरिकांचा आरोप आहे.याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बल्लारपूर यांनी केली.

दिनांक 23/03/2026 ला नायब तहसीलदार माननीय महेंद्र फुलझेले साहेब  यांना निवेदन देण्यात आले. या ग्राहकांना सिलेंडर नाही मिळाले तर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे  तीर्व आंदोलनचा इशारा देण्यात आला. निवेदन देतांना शिष्ट मंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आसिफ शेख, शहराध्यक्ष विक्रांत पंडित, नगरसेवक प्रणित भाऊ सातपुते आणि संजय सूर्यवंशी,सुनील मोदमपल्ली, सचिन भाऊ आदि उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments