हार्डवेअर दुकानाला आग लागल्याने अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान



 हार्डवेअर दुकानाला आग लागल्याने अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान

 बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : शहरातील मुख्य राज्य महामार्गावर असलेल्या एका हार्डवेअर दुकानाला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि. ६) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. जुना बसस्थानक परिसरातील जयकुमार सतरामदास गिडवानी यांच्या हार्डवेअर दुकानाला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

आगीची माहिती मिळताच हार्डवेअर चे संचालक प्रमोद गिडवानी यांनी बल्लारपूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली असता अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सुमारे दीड तासाच्या प्रयत्नानंतर रात्री १२.३० वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आणली. या आगीत दुकानातील साहित्य, विद्युत उपकरणे व इतर माल जळून खाक झाला असून अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज दुकान मालकाने दिली आहे , या संबधी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आलेली असल्याचे समजते.

आग लागण्याचे कारण शॉर्ट सर्किट असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.




Post a Comment

0 Comments