अवैध रित्या देशी विदेशी दारु बाळगुन, विक्री व वाहतुक करणारे इसमाविरुध्द कारवाई, १५,९४,९७०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त
◾देशी विदेशी दारु, वाहतुकीस वापरलेली चारचाकी वाहनासह एकुण १५,९४,९७०/-रु. चा माल जप्त
◾स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ची कामगिरी
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथकास मिळालेल्या गोपनिय बातमीदाराकडुन पोस्टे सावली हद्दीत व्याहाड (बुर्ज) येथील महेश गड्डमवार हा त्याचे परिणीती ट्रॉन्सपोर्ट एका चिल्ड वॉटर नावाचे ऑफीस व गोडावुन येथुन लाल रंगाचे हुंडई क्रेटा कार मध्ये देशी विदेशी दारु वाहतुक करणार आहे अशा स्वरुपाची खात्रीशिर माहितीवरुन सदर ठिकाणी छापा टाकुन नमुद कार, ऑफीस व गोडावुन ची पाहणी केली असता सदर ठिकाणी अवैधरित्या देशीविदेशी दारूसाठा आढळुन आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.
१) देशी दारुच्या ३८०० नग प्रत्येकी ९० एमएलच्या शिश्या किं. १,५२,०००/- रु.,
२) विदेशी दारु रॉयल स्टॅगच्या ३८४ नग १८० एमएलच्या (मध्यप्रदेश) शिश्या किं. ९९८४०/- रु.,
३) विदेशी दारु रॉयल स्टॅगच्या ९६ नग १८० एमएलच्या (महाराष्ट्र) शिश्या किं. २४,०००/-रु.
४) हॅवर्ड ५००० बिअर च्या १४४ कॅन प्रत्येकी ५०० एमएलच्या किं. १८,७२०/- रु.
५) रोख रक्कम २,०९५,४१०/- रु.
६) डिव्हीआर किं. अं.५०००/- रु.
७) हुंडई कार क. एम.एच.४०-एआर-२३६५ किं.अं.१०,००,०००/- रु.
असा एकुण १५,९४,९७०/- रुपयाचा माल जप्त करण्यात येवुन आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन सावली येथे कलम ६५ ई महाराष्ट्र दारुबंदी कायदान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास सावली पोलीस करीत आहे.
सदरची कामगिरी श्री. मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि श्री. संतोष निभोरकर, पोउपनि श्री. सर्वेश बेलसरे, पोहवा गणेश भोयर, चेतन गज्जलवार, दिनेश अराडे, पोअं अजित शेन्डे, सुमीत बरडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.






0 Comments