15 पानांची सुसाइड नोट लिहून तरुण वकिलाची आत्महत्या

 



15 पानांची सुसाइड नोट लिहून तरुण वकिलाची आत्महत्या 


राजुरा,( राज्य रिपोर्टर न्युज ) : राजुरा येथील एका तरुण वकिलाने १५ पानांची सुसाइड नोट लिहून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास उघड़किस आली. ॲडवोकेट अमित जयपूरकर ( 35 ) वय असे मृत वकिलाचे नाव आहे.

 ॲडवोकेट अमित हे मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घरी आले आणि वरच्या मजल्यावरील आपल्या खोलीत निघून गेले. रात्री 8.30 च्या सुमारास त्यांच्या आई त्यांना जेवायला बोलावण्यासाठी वर गेल्या असता खोलीचा दरवाजा उघडाच होता, आत बघताच अमित यांनी स्लॅबच्या हुकला गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिस पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. 

मिळालेल्या माहिती नुसार पुलिस तपासादरम्यान अमित यांच्या खिशातून 15 पानांची एक मोठी सुसाइड नोट जप्त करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके काय कारण आहे, हे अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी ही सुसाइड नोट ताब्यात घेतली असून, त्याचा तपास सुरू आहे.




Post a Comment

0 Comments