पाथरी पोलीस व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने केली मजूरांच्या पोटाची सोय

पाथरी पोलीस व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने केली मजूरांच्या पोटाची सोय         
 पर प्रातींय मजूरांना धान्यासह किराणा वाटप
सावली(राज्य रिपोर्टर) विशेष प्रतिनिधी : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासना मार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजने अंतर्गत गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे.परप़ातीय मजूरांचे हाताला काम नाही व संचारबंदीमुळे ळस्वगावी जाता येत नाही . लहान व्यवसाय करणाऱ्या कारागीर यांचा रोजगार बंद झाल्यामुळे त्यांना घरीच बसून राहावे लागत असून कुटूंबातील सदस्यांच्या पोटापाण्याचा  प्रश्न निर्माण झाला.अशा स्थितीत मुलाबाळांची उपासमार होऊ नये, त्यांना पोटभर अन्न उपलब्ध व्हावे या उदात्त हेतुने राज्य पत्रकार संघ व पाथरी पोलीसांनी नव नियुक्त पोलिस निरीक्षक योगेश घारे यांच्या मार्गदर्शनाखाली  पाथरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गरजु लोकांची माहीती उपलब्ध करुन घेतली. खाकी वर्दीतील लपलेल्या मानुसकीचा परीचय या निमित्ताने पाद्री पोलिसांनी करून दिला.परिसरातील टाटा प्रोजेक्ट ची कामे बंद असुन ठेकेदाराने सुद्धा  पालायन केल्याने काही मंजूर कुटूंबियांना मौशी खांब येथील हनुमान मंदीरात करण्यात आली आहे.या कुटूंबियांना  दि. ५/3/2020 महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा सावली च्या वतीन संचार बंदी दरम्यान परत गावाला जाउ न शकलेल्या टाटा प्रोजेक्टच्या कामावरील या मजूर कुटूंबियांना पाथरी पोलीस स्टेशनचे पो.नि.योगेश घारे यांचे मार्गदर्शनात   पो.ह.दत्ता बोरडे.ना पो. शी .नारायन येगेवार पो.शी प्यारेलाल देवारे व पोलीस पाटील सुरेश गेडाम  ,खेमदेव तुम्मेवार अध्यक्ष म. रा.म. पत्रकार संघ सावली तालुका . डॉ.प्रमोद सोनवने उपाध्याक्ष म . रा.म पत्रकार संघ सावली तालुका  मोरेश्वर उधोजवार प्रसीद्धी प्रमुख म.रा.म पत्रकार संघ सावली, बाबा मेश्राम सचीव म रा.पत्रकार संघ तथा संघाचे सदस्य लोकमत दुधे . योगेश रामटेके .मंगेश सहारे .रेवन घेर .धनंजय मुद्ममवार.  तालुका पत्रकार संघ  यांच्या हस्ते धान्य व किराना सामानाचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

0 Comments