बल्लारपुर पोलिस २७० वाहनाला चालान तर 40 वाहन जप्तीची कारवाई

बल्लारपुर पोलिस विभागाद्वारे वाहनचालकावर कारवाई करण्यास वेग 
२७० वाहनाला चालान तर 40 वाहन जप्तीची कारवाई
बल्लारपुर (राज्य रिपोर्टर): कोरोना या गंभीर बनत चाललेल्या आजारावर एकमेव उपाय म्हणजे सोशल डिस्टेंसिंग व याकरिता नागरिकांनी आपल्या कुटुंबिया सोबत घरी राहणे अपेक्षित असताना अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहे यामुळे सद्यास्थितित चंद्रपुर जिल्ह्यात कोरोना सारखा विषाणुजन्य आजाराचा रुग्ण नसला तरी नागरिकांच्या बेशिस्त वागण्यामुळे कोणतीही शक्यता नाकारता येत नाही व अशी परिस्थिति निर्माण होवू नये म्हणून शासन प्रशासन युध्द स्तरावर कार्य करतांना दिसुन येत आहे. या आजारावर नियंत्रण व्हावे या उद्देशाने वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, पोलिस बांधव, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र एक करून नागरिकांच्या सेवेत आहेत मात्र काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरुन आजाराला आमंत्रण देतात की काय असा प्रश्न निर्माण होतो.
        अशा विनाकारण फिरणाऱ्या नागरिकावर नियंत्रण आणण्यासाठी बल्लारपुर पोलिस विभागातर्फे सख्त स्वरुपात कारवाई करण्यात येत आहे १ एप्रिल २०२० ते ५ अप्रैल २०२० पर्यन्त २७० वाहनचालका वर कारवाई करण्यात आली असून या सर्व वाहनचालकांचे वाहन चालान करण्यात आले तर ४० वाहनाना जप्त करण्यात आले आहे पोलिस विभागाद्वारे करण्यात येणाऱ्या कार्रवाइत दुचाकी, तिनचाकी, व चारचाकी वाहनाचा सुध्दा समावेश आले सदर कारवाई वस्ती विभागातील गोल पुल परिसर तसेच नगर परिषद चौकात करण्यात आली व  यानंतरही नागरिक विनाकारण फिरताना आढळल्यास बल्लारपुर शहरातील अनेक ठिकाणी वाहनचालकावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस विभागाद्वारे देण्यात आली सदर कारवाई मा.शिवलाल भगत पोलिस निरीक्षक बल्लारपुर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागातर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments