सोशल डिस्टनसिंग पालन करतेय तरी कोन ? नागरिकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

सोशल डिस्टनसिंग पालन करतेय तरी कोन ? नागरिकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
दिपक भगत/बल्लारपुर (राज्य रिपोर्टर) : संपूर्ण जगभरात थैमान घालत असलेला कोरोना या विषाणुजन्य आजारावर अनेक नागरिक ग्रस्त असून अनेकांना आपल्या जीवालाही मुकावे लागत आहे कोरोना या जीवघेण्या रोगावर एकमेव उपाय म्हणजे सोशल डिस्टनसिंग मात्र याच सोशल डिस्टनसिंग ची बल्लारपुरात धज्जियां उड़ते की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. बल्लारपुर शहरातील अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून येत आहे विशेष बाब म्हणजे बल्लारपुर पोलिस विभागातर्फे अनेक वाहन चालकाना चालान व काही वाहनचालकाचे वाहन सुध्दा जप्त करण्यात आले आहेत.
          शासनाद्वारे जीवनावश्यक वस्तुची विक्री ही 24 तास सुरु असणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच स्थानिक नगर प्रशासनाच्या वतीने ही नागरिकांना घरपोच साहित्य मिळण्यासाठी वस्ती विभाग, टेकड़ी विभाग व डेपो विभाग अशी विभाग निहाय किराणा दुकान व मेडिकल स्टोर्सच्या दुकानांची यादी दिली असताना तसेच किरकोळ भाजी विक्रेत्या द्वारे नागरिकांच्या दारापर्यंत भाजी मिळत असताना सुध्दा अनेक नागरिक ठोक भाजी मंडी मध्ये जावुन भाजी विकत घेत आहे जरी स्थानिक प्रशासनाद्वारे अनेक उपाययोजना करण्यात येत असल्या तरी अनेक नागरिक एकण्याच्या स्थितीत दिसून येत नाहीत यामुळे खरेच नागरिकांद्वारे सोशल डिस्टनसिंग पाळन्यात येत आहे का?
        कोरोना या आजारावर एकमेव उपाय म्हणजे सोशल डिस्टनसिंग (सामाजिक दूरी) हा उपाय जर श्वानाला कळत असेल तर आपण मानव आपल्याला चांगले वाइट या गोष्टीची जान असताना मग आपण का शासनाद्वारे करण्यात येत असलेल्या आवाहनाचे पालन करण्यास टाळाटाळ करतो आहे तरी आपण एक सुज्ञ नागरिक म्हणून कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर पाहिजे त्या दक्षता घेवून सोशल डिस्टनसिंग चे पालन हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य म्हणून करावे व कोरोना या जीवघेण्या विषाणुजन्य आजारावर मात करावी.

Post a Comment

0 Comments