उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागतिक आरोग्यदिनानिमित्त शुभेच्छा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून
जागतिक आरोग्यदिनानिमित्त शुभेच्छा
मुंबई, (राज्य रिपोर्टर)दि7 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या जागतिक आरोग्यदिनाच्या निमित्ताने राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करत असताना जागतिक आरोग्याचे आणि आरोग्य संघटनेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
'आरोग्यम् धनसंपदा’, आरोग्यासारखे धन नाही, असे मानणारी आपली संस्कृती आहे. परंतु जागतिकीकरणाच्या काळातआधुनिक जीवनपद्धतीत वैयक्तिक आरोग्याच्या बरोबरीनेसार्वजनिकजागतिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. कोरोना संकटाच्या निमित्ताने हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.  यापासून धडा घेऊन भविष्यात वैयक्तिक आरोग्याच्या बरोबरीने सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणासाठी आपण सर्वजण कटीबद्ध होऊया, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments