तर अवैध दारु विक्री "कोरोना "विषाणू संसर्गाचे माध्यम बनेल.

...तर अवैध दारु विक्री "कोरोना "विषाणू संसर्गाचे माध्यम बनेल.
         चंद्रपूर जिल्हयात सध्यातरी एकही कोरोना विषाणू संसर्ग रूग्ण नाही ही बाब दिलासा देणारी असली व भविष्यात जिल्हा या गंभीर संसगा॔पासून दूर राहावा याकरिता प्रशासन उपाय योजना करीत असले तरी मात्र कोरोनाचे "सायलेंट कॅरियर" ठरू
शकणाऱ्या जिल्ह्यातील अवैध दारु विक्रेत्यांना अजूनही गंभीरपणे रडारवर का घेण्यात आले नाही?हा गंभीर प्रश्न आहे.अवैद्ध दारू विक्रेत्यांना रडारवर न घेणे ही मोठी घोडचूक ठरू शकणार आहे.
    एकीकडे पोलिस प्रशासन कोरोना लाकडाऊन सांभाळण्यात व्यस्त आहे तर दुसरीकडे याचा गैरफायदा घेत अवैध दारु विक्रेते आपला धंदा 'जैसे थे 'ठेवण्यात सफल झाले आहेत ही बाब कोरोना संस॔गाच्या दुष्टिने हलक्यावर घेतल्यास भविष्यात यांची मोठी किंमत मोजावी लागू शकतो.
      जिल्ह्यातील अवैध दारु विक्री हा विषय नवा नाही मात्र हा
उपद्व्याप करणाऱ्यांची वाट  आता कोरोना विषाणू संसर्ग परिस्थितीत लावायलाच हवी. लाॅकडाऊन मुळे जिल्ह्याची सरहद्द बंद असताना जिल्ह्यात लगतच्या कोरोना संसग॔
पसरलेल्या यवतमाळ, नागपूर जिल्ह्यातून दारू येणे ही बाब कोरोना संसगा॔स मोठी आमंत्रण देणारी ठरू शकेल. प़ाप्त माहिती नुसार जिल्ह्यातील असा एकही तालुका नाही जिथे देशी, विदेशी बेकायदा उपलब्ध नाही.याचाच अथ॔ स्पष्ट आहे की लाॅकडाऊन मदे दारूची मोठी आयात चोरून होतच
आहे. ही बाब मुळातच गंभीर आहे.अवैद्ध दारू विक्रेत्यांना व चोरून पिणाऱ्यांना "सोशल डिस्टन्सिंग "या गोष्टीशी कसले देणेघेणे?
  जिल्हतील अवैध दारु विक्रीत आता मोहफुल दारूची मोठी भर पडत आहे.मात्र दुदैवाने कॉरोना विषाणू संसर्ग परिस्थितीत या बाबींकडे अवैध व्यवसाय या पलीकडे  बघीतले जात नाही.
     हा जिवघेणा खेळ खेळणाऱ्याचे सालफट सोलल्या जात नाहीत.मात्र गंभीरपणे चिंतन केल्यास हा अवैध धंदा कोरोना संस॔गाचे मोठे माध्यम ठरणार हे सांगायला तत्ववेत्याची गरज कुठे आहे?
            चंद्रपूर जिल्हयात मध्यप़देश, आंध्रप्रदेश, छत्तीसगड
इथून सुद्धा दारू येते ही ओरड जुनीच आहे.ही परंपरा लाॅकडाऊन असताना कायम असेल तर मात्र पोलिस विभागाने मोठे मन करून या चोरट्यांना प्रथमदर्शनी बदडलेच पाहिजे.
                                                  -: लेखन :-
                                               प्रा.महेश पानसे
                           विदर्भ अध्यक्ष , राज्य मराठी पत्रकार संघ

Post a Comment

0 Comments