कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद बल्लारपुर चे नियोजन : जवळपास 6 हजार गरीब नागरिकांच्या भोजनाची सोय करण्यात आली
दिपक भगत/बल्लारपुर (राज्य रिपोर्टर) : कोरोनाच्या जीवघेण्या विषाणुजन्य आजाराने जगभरात थैमान घातले असून चीन अमेरिका स्पेन या अनेक देशात कोरोना हा गंभीर आजाराने धूमाकूळ घालत असताना तसेच अवघा महाराष्ट्र हा कोरोना मध्ये रुग्णाच्या बाबतीत आघाडीवर असतानाही बल्लारपुर नगर परिषदेचे नियोजनामुळे बल्लारपुर शहर सद्यास्थितित नियंत्रणात आहे अशी स्थिति आहे देशात लॉकडाउन होण्याच्या पूर्वीच बल्लारपुर नगर परिषदेने शहरातील 10 महत्वपूर्ण ठिकाणी हैंड वाश करण्याची सोय उपलब्ध करून दिली शिवाय बल्लारपुर शहरात कोरोनाचा प्रसार होवू नये म्हणून शहरात निर्जन्तुकरणा वर भर देण्यात आला शहराच्या अनेक भागात फवारणी करण्यात आली तसेच शहरातील मुख्य रस्ते व चौक अग्निशमन विभागाच्या मदतीने निर्जन्तुकरण करण्यात आले.
याशिवाय लॉकडाउन होण्याच्या काळात रेल्वे ने मुंबई पुण्या वरुण शहरात दाखल झालेल्या 320 प्रवाशी व विद्यार्थ्यांच्या कोरोना तसेच इतर वैद्यकीय तपासणी जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने करण्यात आली याशिवाय शहरातील नागरिकांनी लॉकडाउन चे पालन करावे म्हणून पोलिस विभाग व प्रशासकीय विभागाच्या माध्यमातुन 3 फिरते पथक नेमले आहेत व त्यांच्याद्वारे नागरिकांना सुचना देण्यात येतात. बल्लारपुर शहरातील निर्वासित असलेल्या नागरिकांना निवारा मिळावा या उद्देशाने रैन बसेरा(शेल्टर होम) बचत भवन बल्लारपुर येथे स्थापन करण्यात आला आहे तसेच बल्लारपुर शहरातील कुणीही गोरगरीब किंवा निराश्रित उपाशी राहु नये म्हणून बल्लारपुर विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी वित्त वन व नियोजन मंत्री श्री सुधिरभाऊ मूनगंटीवार यांच्या सहकार्य व प्रशासनाच्या माध्यमातुन शहरातील गोरगरीब व गरजू नागरिकापर्यंत दररोज जवळपास 3000 नागरिकापर्यंत फ़ूड पैकेट सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाटप केले जात आहे याशिवाय बल्लारपुर शहरातील कोरोनाचा प्रसार होवू नये म्हणून वैद्यकीय विभाग, पोलिस विभाग, प्रशासकीय विभाग, महसूल विभाग, प्रसार माध्यम प्रत्येक विभाग आपापल्या परीने कार्यरत आहे बल्लारपुर शहरातील कुणीही नागरिकास कोरोना होवू नये व कुणीही नागरिक उपाशी राहु नये यासाठी मा. विपिन मुद्दा मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपुर, मा. हरीश शर्मा, नगराध्यक्ष बल्लारपुर बल्लारपुर नगर परिषदेचे सर्व सभापति नगरसेवक सर्व अधिकारी व कर्मचारी प्रयत्नरत आहेत.



0 Comments