एमडी विक्रेत्यावर चंद्रपुर शहर पोलिसांची कारवाई

 




एमडी विक्रेत्यावर चंद्रपुर शहर पोलिसांची कारवाई 

◾2.71 ग्रॅम एमडी पावडर जप्त, 31 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत


 चंद्रपुर,( राज्य रिपोर्टर न्यूज ) : चंद्रपुर शहरात अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात कारवाई करत चंद्रपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने महाकाली कॉलरी परिसरात छापा टाकून एमडी ( अमली पदार्थ ) जप्त केला. या प्रकरणी उदय तिरुपती झाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दि. 10 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की महाकाली कॉलरी येथे राहणारा उदय झाडे हा आपल्या घराजवळ एमडी ( अमली पदार्थाची ) विक्री करीत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून तपासणी केली.

या कारवाईत पोलिसांनी 2.71 ग्रॅम एमडी पावडर, दोन इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, अमली पदार्थ ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचे बंडल आणि दोन मोबाईल फोन असा एकूण 31 हजार 940 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.  या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कपिल घुगे करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक कुणाल रामटेके, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलते, पोलीस उपनिरीक्षक कपिल घुगे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.



Post a Comment

0 Comments