हिवरपुरी बाल गणेश मंडळाचा प्रथम पुरस्काराने गौरव

 







हिवरपुरी बाल गणेश मंडळाचा प्रथम पुरस्काराने गौरव

◾आकर्षक देखावे, शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूक आणि सामाजिक सलोख्यासाठी पोलिस अधीक्षकांकडून कौतूक

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : सामाजिक सलोखा, शांतता, शिस्त आणि सामाजिक विषयांवरील आकर्षक देखाव्यांच्या माध्यमातून जनजागृती केल्याबद्दल हिवरपुरी बाल गणेश मंडळाला चंद्रपूर जिल्हा पोलिस दलातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवातील प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळाला प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले.

गणेशोत्सव आणि विसर्जन सोहळ्यादरम्यान मंडळाने उत्सवाचे पावित्र्य जपत सामाजिक भान राखले. तसेच वेळेचे बंधन पाळून शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूक काढली. पोलिस प्रशासनाने दिलेल्या सर्व नियम, अटी आणि सुरक्षाविषयक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य केले. उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू न देता आदर्श आणी पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल मंडळाचा गौरव करण्यात आला. विसर्जन मिरवणुकीत मंडळाने सामाजिक विषयांवर आधारित विविध आकर्षक देखावे सादर करून नागरिकांमध्ये जनजागृती केली. या उपक्रमाचीही पोलिस प्रशासनाने विशेष दखल घेतली. हिवरपुरी बाल गणेश मंडळ गेल्या 44 वर्षांपासून सामाजिक सलोखा जपत विविध सामाजिक विषयांवरील आकर्षक देखावे सादर करून जनजागृतीचे कार्य करीत आहे. यापूर्वीही मंडळाने विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन पुरस्कार मिळविले आहेत. या वेळी मंडळाचे सभी पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments