शिक्षक दिनानिमित्त म्हाडा कॉलनीत वृक्षारोपण

 





शिक्षक दिनानिमित्त म्हाडा कॉलनीत वृक्षारोपण

◾पर्यावरण संवर्धनासाठी नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

चंद्रपूर,( Rajya Reporter News ) : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय एकात्मता पर्यावरण संवर्धन समिती, चंद्रपूर यांच्या वतीने शिक्षक दिनाच्या अनुषंगाने म्हाडा कॉलनी येथील खुल्या जागेत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

शहराचे पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून, या सामाजिक उपक्रमात स्थानिक नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ‘एक विद्यार्थी–एक झाड’ आणि ‘एक नागरिक–एक झाड’ या संकल्पनेतून अधिकाधिक वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच भावी पिढीला स्वच्छ, हिरवेगार आणि निरोगी वातावरण मिळावे, या उद्देशाने समितीच्या माध्यमातून विविध भागांत वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या कार्यक्रमास समितीच्या हरित चंद्रपूर संस्थेचे अध्यक्ष तथा प्रकल्प निर्देशिका डॉ. कल्पना गुलवाडे, समितीचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे तसेच समितीचे संरक्षक वसंतराव थोटे समितीचे कोषाध्यक्ष निलेश काळे मयूर भोकरे, अनिल भुले, संगीता राजुरकर, गणपत ओल्हे, तितक्षा यादव, ईश्वर के सहारे, सिद्धांत चांदेकर, सुजाता झालबडे, सुलभा चौहान, योगेश आडे, अनिल बोडे, मुकेश बांडे, रुद्र चौहान, रियांशी गेडाम, अक्षर बोडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्थानिक नागरिक, विद्यार्थी व पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

“वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरण वाचवा” हा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.



Post a Comment

0 Comments