आझाद समाज पक्षाच्या चंद्रपूर शहराध्यक्षपदी सुनील श्रीवास

 




आझाद समाज पक्षाच्या चंद्रपूर शहराध्यक्षपदी सुनील श्रीवास

◾निलेश ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास , शेकडो युवकांचा पक्षात प्रवेश


चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : आझाद समाज पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष निलेश ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत चंद्रपूर शहरातील शेकडो युवकांनी आझाद समाज पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे शहरात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

यावेळी सुनील कुमार श्रीवास यांची आझाद समाज पक्षाच्या चंद्रपूर शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य सदस्य तथा गोंदिया जिल्हा प्रभारी सुरेंद्र रायपुरे यांच्या हस्ते श्रीवास यांना प्रदान करण्यात आले. नियुक्तीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोषात स्वागत केले.

कार्यक्रमाला सुरेंद्र रायपुरे, आझाद समाज पक्षाचे जिल्हा सचिव प्रणित भगत यांच्यासह सातपुते, अमर चांदेकर, कपील भगत, दुर्योधन तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद हे देशातील युवक, वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरात पक्षाची संघटनात्मक वाटचाल मजबूत होत असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी जिल्हाध्यक्ष निलेश ठाकरे सातत्याने प्रयत्नशील असून, युवकांना पक्षाच्या संघटनेशी जोडण्यावर विशेष भर दिला जात आहे. शहराध्यक्षपदाची जबाबदारी सुनील कुमार श्रीवास यांच्यावर सोपविण्यात आल्याने आगामी काळात शहरातील संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

युवकांची वाढती साथ ही परिवर्तनाच्या राजकारणाला मिळणारा जनाधार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आझाद समाज पक्षाची संघटना अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करू असा विश्वास जिल्हाध्यक्ष निलेश ठाकरे यांनी व्यक्त केला.



Post a Comment

0 Comments