पोक्सो प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता; अधिवक्ता संजय बाजपेयी यांच्या प्रभावी युक्तिवादाला यश
बल्लारपूर,( Rajya Reporter News ) : गंभीर स्वरूपाच्या आरोपांखाली सुरू असलेल्या पोक्सो प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर यांनी आरोपी नाना उर्फ संतोष सरकाटे उर्फ नाना प्रकाश येरमे यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. २० ऑगस्ट २०२६ रोजी न्यायालयाने हा निकाल दिला.
सरकार विरुद्ध नाना उर्फ संतोष सरकाटे उर्फ नाना प्रकाश येरमे या प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६(३), ३७६(२)(एफ), ३७६(२)(एन) व ३२३, तसेच पोक्सो अधिनियम २०१२ मधील कलम ४ व ६ आणि बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ मधील कलम ७५ अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते.
या प्रकरणात अभियोजन पक्षाने आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यासाठी विविध साक्षीदारांचे जबाब तसेच दस्तऐवजी पुरावे न्यायालयासमोर सादर केले. सरकार पक्षातर्फे सरकारी अधिवक्ता आसिफ शेख यांनी बाजू मांडली.
तर आरोपीच्या बचावासाठी बल्लारपूर येथील अधिवक्ता संजय प्रभूदयाल बाजपेयी यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला. बचाव पक्षाने अभियोजन पक्षाच्या पुराव्यांतील बाबी व आरोप सिद्ध करण्याच्या मुद्द्यांवर न्यायालयाचे लक्ष वेधून घेतले.
बचाव पक्षाच्या प्रभावी युक्तिवादानंतर मा. जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर यांनी २० ऑगस्ट २०२६ रोजी आरोपी नाना उर्फ संतोष सरकाटे उर्फ नाना प्रकाश येरमे यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.
या निकालामुळे अधिवक्ता संजय बाजपेयी यांच्या प्रभावी न्यायालयीन युक्तिवादाची चर्चा होत असून, प्रकरणात बचाव पक्षाला यश मिळाले आहे.






0 Comments