स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन

 




स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन

◾मूल येथे तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर उत्साहात

मूल, ( राज्य रिपोर्टर न्यूज ) : जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर अंतर्गत मूल तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर स्थानिक नवभारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे नुकतेच उत्साहात पार पडले.

इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी व आठवी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेला बसणाऱ्या हिंदी, इंग्रजी व मराठी माध्यमातील शासकीय, खाजगी अनुदानित तसेच इंग्रजी कॉन्व्हेंट शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन केंद्र संचालिका आम्रपाली बागेसर, विषयतज्ज्ञ आनंद गोंगले, प्राचार्य बारसागडे, प्रा. महेश पानसे व तज्ज्ञ मार्गदर्शक किशोर नरड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक किशोर नरड यांनी विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आणि सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेची परीक्षा पद्धती, नवीन अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेचे स्वरूप, वेळेचे नियोजन, प्रश्न सोडविण्याच्या पद्धती तसेच प्रभावी अभ्यासतंत्र याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, योग्य नियोजन आणि सरावाला प्राधान्य देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी आत्मविश्वास निर्माण झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित अतिथींचे आयोजकांच्या वतीने गुलाबपुष्प, पेन-डायरी व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. या शिबिराला विविध शाळांमधील विद्यार्थी पालकांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शिबिराच्या यशस्वितेसाठी भरतकुमार, शिपाई राहुल नागपुरे, आकाश सिडाम यांच्यासह आयोजकांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच विविध स्पर्धात्मक परीक्षांची योग्य दिशा व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरले.



Post a Comment

0 Comments