चंद्रपुरात उत्साहात संपन्न क्रीडा पर्व 2026
◾मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांची सांगता
◾विजयी खेळाडूंचा आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
चंद्रपूर,( Rajya Reporter News ) : हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून चंद्रपुरात "क्रीडा पर्व 2026" ची उत्साहात सांगता झाली. डेव्हलपमेंट ॲन्ड रिसर्च एज्युकेशन मल्टिपर्पज सोसायटी (ड्रिम), चंद्रपूरच्या वतीने या भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या क्रीडा पर्वांतर्गत चंद्रपुरात कबड्डी स्पर्धा , खो-खो स्पर्धा, हॉकी स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धा आणि नेटबॉल स्पर्धा यांसारख्या विविध खेळांच्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमध्ये स्थानिक खेळाडूंनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत आपला खेळ दर्शवला.
खेळाडूंमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी आणि आरोग्याविषयी जनजागृती व्हावी, यासाठी शहरातून एक भव्य बाईक रॅली देखील काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या विशेष कार्यक्रमात महापौर संगीता खांडेकर ,पोलीस निरीक्षक प्रभावती एकूरके जिल्हा क्रीडा अधिकारी विनोद ठीकरे,सचिन राखोंडे सहाय्यक पोलीस निरीक्षण पो. स्टे. रामनगर, मोरेश्वर गायकवाड क्रीडा अधिकारी, मिलिंद तेलंग यांच्या हस्ते विजयी खेळाडूंना सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले, तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मानकऱ्यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
या क्रीडा पर्वाला यशस्वी करण्यासाठी ड्रीम चंद्रपूर चे अध्यक्ष प्रेम गावंडे, उपाध्यक्ष अभिजीत दुर्गे, सचिव अनिल ठाकरे, कोषाध्यक्ष निलेश शेंडे, स्पर्धा सचिव विक्की पेटकर, निखिल पोटदुखे, राजकुमार जांबुळे, सुरज गंधेवर, शुभम साखरे, शुभम पुणेकर, लोकेश मोहुर्ले, दिनेश सावसागडे, भारत विरुटकर, अपूर्व खुळसंगे, हर्षल वरारकर, श्लोक मित्तल, अमन मंडल, आर्यन मोहुर्ले, प्रमोद मेश्राम, सोनाली गावंडे, कोमल कुवर, श्रुती भारती, शर्वरी लभाने, कोमल चौधरी आदी ने परिश्रम केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय तावाडे यांनी केले.










0 Comments