विविध मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अशोक उईके यांची भेट - विक्रांत सहारे

 





विविध मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अशोक उईके यांची भेट - विक्रांत सहारे

◾भीमजयंती रॅलीत घडलेलं हे हत्याकांड आंबेडकरी उत्सवावर झालेला मोठा घात

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयन्तीनिमित्त निघालेल्या रॅलीत बौद्ध अनुयायी रविकांत टेम्भूरकर यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. प्रथमच जिल्ह्यात अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी मृतक टेम्भूरकर यांच्या पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घेत त्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी पालकमंत्री अशोक उईके यांच्याकडे केली आहे.

भीमजयंती रॅलीत घडलेलं हे हत्याकांड आंबेडकरी उत्सवावर झालेला मोठा घात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अनुयायी तर्फे टेम्भूरकर हत्याकांड प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात व्हावी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासह आरोपीवर ऍट्रॉसिटी व मकोका सारखे गुन्हे दाखल करण्यात यावे. 

पुन्हा असा प्रकार भीम जयंती उत्सवात घडायला नको याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी. अश्या विविध मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अशोक उईके यांची भेट घेत विक्रांत सहारे यांनी दिले. यावर पालकमंत्री उईके यांनी पोलीस प्रशासनाला या प्रकरणाची माहिती सादर करा असे निर्देश देत या प्रकरणाचा सखोल तपास करीत दोषी आरोपींवर कठोर कारवाई करू असे आश्वासन निवेदनकर्त्यांना दिले. उर्वरित मागण्यांवर सुद्धा पालकमंत्र्यांनी सकारात्मकता यावेळी दर्शवली.

यावेळी टेम्भूरकर कुटुंबातील सदस्य, नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments