आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पेतुन रविवारी धानोरा येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

 




आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पेतुन रविवारी धानोरा येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

◾तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी सह होणार उपचार

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून तसेच भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर तालुका व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत “सर्वरोग निदान व उपचार शिबिर” आयोजित करण्यात आले आहे.  हे शिबिर येत्या ५ एप्रिल २०२६ (रविवार) रोजी जिल्हा परिषद शाळा, धानोरा, येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत पार पडणार आहे.

  या शिबिरामध्ये विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. विशेषतः मेडिसिन, न्यूरो, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, त्वचारोग, कान-नाक-घसा अशा विविध विभागातील तज्ञ डॉक्टर सेवा देणार आहेत.

   शिबिरात येणाऱ्या रुग्णांची नोंदणी, तपासणी, एक्स-रे, रक्त व लघवी तपासणी तसेच आवश्यकतेनुसार औषधोपचार मोफत करण्यात येणार आहेत. गंभीर रुग्णांसाठी पुढील उपचारांची व्यवस्था देखील करण्यात येणार असून काही निवडक शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.

             यामध्ये विशेषतः हायड्रोसिल, हर्निया, गर्भाशयाचे ऑपरेशन, मोतीबिंदू तसेच इतर शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. तसेच रुग्णांना आवश्यक त्या ठिकाणी रेफर करून पुढील उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिबिरात सहभागी होणार्या रुग्णांनी आधार कार्ड, रेशन कार्ड व आयुष्यमान कार्ड (असल्यास) सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

            या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मोफत उपलब्ध होणार असून, मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments