संघटनात्मक बांधणीतून पक्षाचे विचार तळागळापर्यंत पोहोचवा - आ. विजय वडेट्टीवार

 



संघटनात्मक बांधणीतून पक्षाचे विचार तळागळापर्यंत पोहोचवा - आ. विजय वडेट्टीवार

◾सिंदेवाही येथे पदाधिकारी, व कार्यकर्ता बैठकीत आवाहन

सिंदेवाही ( राज्य रिपोर्टर ) : राज्याच्या राजकारणात एकीकडे धर्मांधांकडून जातीपातीच्या नावावर अराजकता पसरविण्याची काम सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र पक्ष निष्ठेची लक्तरे वेशीवर टाकली जात आहे. अशा विदारक परिस्थितीत धर्मनिरपेक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे बलिदान, विकासात्मक दूरदृष्टी, व सामान्य जनते प्रती असलेले आदर व प्रेम ह्या विचारांची सांगड घालून संघटनात्मक बांधणीतून पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवे असे आवाहन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी  केले आहे. ते सिंदेवाही येथे विश्रामगृहात पार पडलेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत बोलत होते.

स्थानिक विश्रामगृहात आहे पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत राज्याचे माजी आपत्ती व्यवस्थापन व मदत मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे, महिला तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सीमा सहारे, शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील उट्टलवार, नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, माजी नगराध्यक्ष आशाताई गंडाते, नगरपंचायत सभापती भास्कर ननावरे, दिलीप रामटेके, नगरसेवक पंकज नन्नावार, श्याम छत्रवाणी, महिला नगरसेविका काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, पक्षाचा कार्यकर्ता हा ग्रामीण असो की शहरी भागातील असो तो पक्षाचा " कणा' म्हणून काम करीत असतो. काँग्रेस पक्षाने स्थापनेपासूनच संपूर्ण देशात विकासाची क्रांती घडवली. याच दरम्यान काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी जनसेवेसाठी बलिदानही दिले. हे बलिदान व्यर्थ न जाऊ देता आज घडीला राज्यात जे धर्मांधांकडून जातीपातीच्या नावावर अराजकता पसरविल्या जात आहे त्याचा बिमोड करण्यासाठी संघटनात्मक बांधणी तून पक्षाचे विचार घरोघरी व तळागाळा पर्यंत पोहोचविणे काळाची गरज असून पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याने पक्ष संघटनावर जोर देणे गरजेचे आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकित विजयश्री खेचून आणण्यासाठी आजच प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकाऱ्याने कंबर कसून प्रयत्नशील परकाष्टा करावी असे आवाहन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शनातून केले. तसेच मतदार संघातील प्रत्येक गावात भेटीगाठीतून पक्ष संघ नात्मक बांधणीवर अधिकाधिक जोर दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी उपस्थितांना दिली. यावेळी सिंदेवाही तालुक्यातील बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments