बल्लारपूर पोलीस स्टेशन डी.बी. पथक सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीवर 4 मोटर सायकल चोर आरोपीला अटक
◾एकूण 1,60,000/- रु.कि च्या एकुण चार मोटर सायकलसा मुद्दामाल जप्त
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर पोलीस ठाणे अप क्र. 469/2022 भा.द.वि. कलम 379 या गुन्ह्यांचे तपास करत असताना डी.बी पथकामार्फत घटनास्थळा वरील सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदार याचे कडून माहिती प्राप्त करुन त्या प्रमाणे आरोपीत यास गडचांदुर येथून ताब्यात घेतले व सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केल्यावर आरोपीत नामे नितीन नात्तुजी मारबते यास दि. 05/05/2022 रोजी अटक करुन पोलिस कोठडी दरम्यान त्याचेकडे कौशल्य पुर्ण तपास करुन बल्लारपूर पोलिस स्टेशन येथिल 2 मोटर सायकल, मुल पोलिस स्टेशन 1 मोटर सायकल व रामनगर पोलिस स्टेशन येथिल 1 मोटर सायकल असे एकुण 4 मोटर सायकल चोरीचे गुन्हे व गडचांदूर पोलिस स्टेशन येथिल 1 चोरीचा गून्हा असे एकूण 5 गून्हे उघडकीस आणले आहेत. त्यामध्ये खालीलप्रमाणे माल जप्त करण्यात आला आहे.
1) 50,000 /- रु. की बजाज 220 पल्सर, 2) 50,000 /- रु.की.ची होंडा डीवो, 3) 50,000/- रु.की.ची TVS Star, 4) 10,000/- रु.की ची बजाज डिस्कवर असा एकूण 1,60,000/- रु.कि च्या एकुण चार मोटर सायकल मिळुन जप्त करण्यात आल्या आहेत. सदर कारवाई पो.नी. पाटील यांचे मार्गदर्शन सपोनी. विकास गायकवाड, पो.हवा. रानविजय ठाकुर, आनंद परचाके, सुधाकर वरघणे, नापोशी शरद कुडे, सत्यवण कोटणाके, राकेश बंजारीवाले, संतोष दंडेवार, पोशी श्रीनिवास वाबिटकर, शेकर मथांकर, दिलीप अदे यांनी केली आहे.






0 Comments