जुगार अड्ड्यावर धाड : जवळपास ४ लाख रु चा मुद्देमाल जप्त १३ व्यक्तीवर गुन्हे दाखल ६ अटक तर ७ फरार !
◾रामनगर पोलिसांची बाबूपेठ परिसरात जुगार अड्ड्यावर धाड
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रभागातील जंगल परिसरात १३ व्यक्ती मिळून जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती रामनगर पोलिसांना मिळतात त्यांनी या जुगार अड्ड्यावर धाड टाकली असता त्याठिकाणी ६ आरोपीना अटक करण्यात आली तर ७ आरोपी फरार झाल्याची माहिती आहे यावेळी पोलिसांनी सदर आरोपिकडून मोबाईल, दुचाकी, असा एकूण जवळपास ४ लाख रु चा मुद्देमाल जप्त केला आहे. याविषयीच्या अधिक माहितीनुसार रामनगर पोलिसांचे पथक ३० जानेवारीला रात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना गोपनीय सूत्राद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारावर जंगल परिसरात काही इसम जुगार खेळत असलेल्या ठिकाणावर धाड टाकली यातील काही इसम फरार होण्यात यशस्वी झाले मात्र पोलिसांनी ६ इसमाना अटक केल्याची माहिती आहे. पोलीस सूत्रानुसार राकेश पडोळे, अहतेशाम बेग, कैलाश दुर्गे, रोशन जांभूळकर, आकाश कांबळे, रवी शर्मा अशी अटक केलेल्या व्यक्तीची नावे आहेत या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.


0 Comments