चंद्रपुर जिल्हात घुग्घुस: येथील न्यू, रेल्वे सायडिंग
रेल्वेच्या धडकेत रेल्वे कर्मचाऱ्यांचे दोन्ही पाय निकामी
घुग्घुस(राज्य रिपोर्टर) : काल दुपारच्या सुमारास रेल्वे कर्मचारी फिरत असताना अचानक रेल्वेचा धक्का त्या कर्मचाऱ्याला लागल्याने या घटनेत त्या कर्मचाऱ्यांचे दोन्ही पाय निकामी झाले,या घटनेत रेल्वे कर्मचारी ४६ वर्षिय राजू सदाशिव संगोजीवार हे काल दोन वाजेदरम्यान रेल्वे कार्यरत करित असताना घटना झाली, न्यू,सायडिंगवर होते,त्यावेळी लाइनवर मालगाड़ी कोळसाच्या उभ्या अवस्थेत होती,मात्र अचानक काही वेळातच ती सुरु झाली,सदर कर्मचाऱ्याला रेल्वे सुरु झाली याचे भान नसल्याने त्यांना त्या रेल्वेचा जबर धड़क बसली, धड़क बसल्याने संगोजीवार हे खाली पडल्याने त्यांच्या पायावरुन रेल्वे गेल्याने त्यांचा एक पाय हा अक्षरश: वेगळा झाला व दुसऱ्या पायाला गंभीर दुखापत झाली,घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ संगोजीवार याना पुढील उपचारासाठी नागपुर येथे किंगस्वे रुग्णालयात पाठविण्यात आले,पुढील तपास सुरु आहे,



0 Comments