मोंटफोर्ट स्कुल पालक संघर्ष समिती  बल्लारपूर यांच्या मागणी  

शाळेची फी न भरल्यामुळे शिक्षणापासूनच वंचीत : बल्लारपूर येथील खाजगी शाळेतील प्रकार

बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) : मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून देशभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे त्यामुळे देशभरातील शाळा महाविद्यालय बंद अवस्थेत आहे जरी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान दानाचे कार्य होत असले तरी या कोरोनाच्या संकटात प्रत्येक विद्यार्थी वा पालक आपल्या पाल्याना ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध करून देईलच याची शास्वती नाही शिवाय ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणासाठी नेटवर्कची समस्या तर आहेच

 या सर्व बाबी लक्षात घेता खाजगी शाळांनी शिक्षण उपलब्ध करून देतांना कोरोना परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांना सवलत देने अपेक्षित आहे अशी मागणी पालक संघर्ष समिती बल्लारपूर च्या वतीने करण्यात आली आहे या समितीच्या माहितीनुसार बल्लारपूर येथील बामणी परिसरात असलेल्या मोंटफोर्ट हायर सेकेंडरी स्कुल ने 2020-21 या सत्राची पूर्ण फी न भरल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या ग्रुप मधून बाहेर केले आहे यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूलभूत अधिकारा पासूनच वंचीत रहावे लागते की काय असा प्रश्न निर्माण होत आहे विशेष म्हणजे 2020-21 हे वर्ष कोरोनाच्या संसर्गजन्य आजारामुळे गाजले असून यात अनेकानी आपल्या आप्तस्वकीयांना गमावले तसेच अनेकांचा या लॉकडाउन मुळे रोजगार गेला, नोकऱ्या गेल्या अनेकांना आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यात अडचण येत असतांना खाजगी शाळा चालक पूर्ण फी साठी तगादा लावत आहे मागील वर्षी ऑनलाइन शिक्षण जवळपास 7-8 महिने चालले यासाठी पालकांनी आपल्या पाल्याना महागडे मोबाईल सोबत रिचार्ज करून दिले शिवाय खाजगी शाळेत काही पालकांचे एकापेक्षा अधिक मूल शिक्षण घेतात आशा परिस्थितीत मागील सत्राची पूर्ण फी कशी काय द्यावी जरी खाजगी शाळांच्या अनेक अडचणी असल्या तरी शासनाच्या आदेशानुसार कोणताही विद्यार्थी फी अभावी शिक्षणापासून वंचीत राहता कामा नये शिवाय सद्यस्थितीत असलेल्या पालक समितीला पूर्ण माहिती न देता पालकांकडून फी वसुली करून पालकांवर अन्याय केला जात आहे विशेष बाब म्हणजे 2020-21 या सत्रात विद्यार्थ्यांवर ज्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या त्या आधारावर फी वसूल करण्यात यावी अशी मागणी मोंटफोर्ट स्कुल पालक संघर्ष समिती ने बल्लारपूर शहरातील स्थानिक विश्राम गृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली तसेच सदर निवेदन मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर, शिक्षण उपसंचालक, नागपूर,  शिक्षणाधिकारी चंद्रपूर, जिल्ह्यातील आमदार व खासदार इ ना निवेदनातून मागणी करण्यात आली आहे सदर पत्रकार परिषदेला मोंटफोर्ट स्कुल पालक संघर्ष समितीचेे  अध्यक्ष रितेश बोरकर, एंड.पवन मेश्राम, संजय तंगडपल्लीवार, संजय कनकमल, संजय रामटेके, मंगलदीप हस्ते,इश्वर शेळके,तेजींदर बिंद्रा, निशांत सूटे  पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

          या संबंधात सदर शाळेत माहिती घेतली असता या काळात आम्ही विद्यार्थाना उपयुक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न केला तसेच या कार्यात अनेक शिक्षकांनी महत्वपूर्ण योगदान दिले असले तरी शिक्षकांच्या अडचणी ही आहेत शिवाय कोरोना काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला असला तरी आम्ही कोणताही विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचीत राहणार नाही याची दक्षता घेऊ अशी माहिती स्कुल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.