युवकांच्या सक्रिय सहभागामुळेच पक्षाला चांगले दिवस – अरुणभाई गुजराथी …! राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ‘युवक जोडो’ या संपर्क अभियानाची चोपडा येथे बैठक संपन्न.

 

युवकांच्या सक्रिय सहभागामुळेच पक्षाला चांगले दिवस – अरुणभाई गुजराथी …! राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ‘युवक जोडो’ या  संपर्क अभियानाची चोपडा येथे बैठक संपन्न.

 जळगाव/चोपडा (राज्य रिपोर्टर) : जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाभरातील जास्तीत जास्त युवा वर्ग पक्षाशी जोडण्यासाठी व या युवाशक्तीचा वापर सुदृढ समाज उभारणी करण्याकरिता व्हावा या अनुषंगाने जिल्हाभर संपर्क अभियान राबविण्यात येत आहे.याच अनूषंगाने चोपडा येथे महिला मंडळ हायस्कुलच्या सभागृहात शहर व तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसमार्फत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. २२ वर्षाच्या काळात पक्षाची स्थापना झाल्यानंतर पुढचे १५ वर्षे सलग सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील गोरगरीब व कष्टकरी जनतेसाठी घेतलेले समाजोपयोगी निर्णय तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार केंद्रीय मंत्री असताना त्यांचे कृषी, शिक्षण, विज्ञान, आरोग्य, कला,क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे बहुमूल्य योगदान तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावे हा एकमेव उद्देश घेऊन हे अभियान राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे. जामनेर येथून या अभियानाची सुरुवात झाली तर त्यानंतर यावल, रावेर व चोपडा येथे या अभियानाची आढावा व नियोजन बैठक संपन्न होऊन चोपडा तालुक्यात सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभाध्यक्ष, राष्ट्रवादीचे  माजी प्रदेशाध्यक्ष,ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी हे होते.अरुणभाई गुजराथी यांनीच या बैठकीसाठी पुढाकार घेत तालुक्यातून जास्तीत जास्त युवक कसे या बैठकीला उपस्थित राहतील याची दक्षता घेतलेली होती यासाठी केलेल्या योजनाबद्ध नियोजनामुळे ही बैठक यशस्वी झाली. यावेळी अध्यक्षीय भाषणात अरुणभाई गुजराथी म्हणाले कि ज्या पक्षात मोठ्या प्रमाणात युवकांचा सक्रिय सहभाग असतो, त्या पक्षाला चांगले दिवस येत असल्याचे सांगितले. आजची तरुणाई ज्या वेगाने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपलं म्हणणं कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवू शकते त्यामुळेच त्याचा दिर्घकालीन फायदा पक्षाला होत असतो.गावोगावी, खेड्यापाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसची  पायाभरणी आणखी मजबुत करायची असल्यास  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडलेली ‘वन बूथ, टेन युथ’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवली जाण्याची आवश्यकता असल्याचंही ते आपल्या भाषणात म्हणाले. म्हणूनच शहर तसेच तालुका युवक कार्यकारिणीतर्फे लवकरात लवकर बूथ कमिट्या तयार करून गांभीर्याने पक्षवाढीसाठी प्रयत्न गरजेचं असल्याचं ते म्हणाले. यानंतर युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील यांनीही पक्षात जे युवक जमिनीवर उतरून योगदान देतील, प्रामाणिकपणे पक्षासाठी झटतील अशाच युवा कार्यकर्त्याना पक्षातर्फे आगामी काळात संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं. यासाठी शरद पवारांचे पुरोगामी विचार तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचंही मत त्यांनी यावेळी मांडले.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, चोपडा पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, जिल्हा परिषद सदस्या निलम पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा विजया पाटील यांनीही मनोगते व्यक्त केलीत.यावेळी चोपडा साखर कारखान्याचे चेअरमन अतुल ठाकरे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कांतिलाल पाटील,चोपडा पिपल्स बँकेचे व्हाईसचेअरमन प्रविण गुजराथी,शेतकी संघ प्रेसिडेंट दुर्गादास पाटील, पंचायत समिती उपसभापती सुर्यकांत खैरनार, जिल्हा युवक कार्याध्यक्ष दिपक पाटील, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सनी सचदेव, जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल स्वामी, शहर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पाटील,तालुकाध्यक्ष मनोज पाटील, युवक शहराध्यक्ष समाधान माळी, पं.स.माजी सभापती कल्पना पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्षा भारती बोरसे, मार्केट कमिटीचे माजी सभापती गिरीश पाटील, पं.स.माजी सभापती भरत पाटील,विनायक पाटील, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष निलेश बोदडे, सरपंच दत्ता साबळे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments