मध्यभारतातील पहिले वेबनार सिरीजचा चंद्रपूर..गडचिरोलीत प्रारंभ.
लाॅकडाऊन मुळे माघारलेल्या विद्यार्थांना मिळाली नवी गती.
गोंडवाना विद्यापीठ व रेनाॅयसन्स इन्स्टिटयुटचे महत्कार्य.
चंद्रपूर/गडचिरोली (राज्य रिपोर्टर) : कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर देशभरात .२१ मार्च पासून लाकडाऊन सुरू आहे. यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमीत वर्गाअभावी मोठे शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे हेरून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या एन.एम.पुगलिया ट्रस्ट
ने पुढाकार घेतला व शेवटी गोंडवाना विद्यापीठ चे सहकार्याने
वेबीनार सिरीज चे ५ दिवसीय पूर्ण वेळ आयोजन करून मागे
पडलेल्या सर्वसामान्य होतकरू विद्यार्थ्यांना नवी गती देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आले आहे. एन.एम.पुगलिया ट्रस्ट द्वारा संचालित चंद्रपूर व रद्द क्षण गडचिरोली येथील रेनाॅयसन्स इन्स्टिटयुट व गोंडवाना विद्यापीठ यांच्या दिली.
९ एप्रिल पासून सुरू करण्यात आलेले मध्यभारतातील हे पहिले वेबनार सिरीज असणार आहे हे विशेष.
दि.९ एप्रिल ते १३ एप्रिल पर्यंत प्रारंभीक सुरू करण्यात आलेल्या या वेबीनार सिरीज हमचे
उद्घाटन कुलगुरू डॉ.कल्याणकर यांनी केले.या वेळी विद्यापीठ सचिव मोहूलै सर, भुसारी सर, सूर्या सर उपस्थित होते. वेबीनार सिरीज ची सुरवात "अनरिलींग इंटरप्रिनीअरशिप "या उद्योजकता विकास या विषयापासून करण्यात आली.
पुढील वेळापत्रकानुसार "रोल ऑफ एम्पालाईज इन इ कॉमर्स कंपनीज, "डिझाईन युवर ड्रीम्स,"फलाईट ऑफ सक्सेस","एम्पाॅयमेंट अपारचुनिटीज आप्त्टर ..कोशिश 19"अशा अनेक विषयांवर तज्ञांचे शैक्षणिक मार्गदर्शन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लाभणार आहे.
राज्य व राज्याबाहेरील ३८२ विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी या वेबीनार सिरीज चार लाभ घेतल्याचे एन.एम.पुगलिया ट्रस्ट चे अध्यक्ष नितीन पुगलिया यांनी सांगितले असून लाॉकडाऊन मध्ये वाढ झाल्यास हे ऑनलाइन शैक्षणिक मार्गदर्शन
सिरीज..२ चे रूपात पुन्हा वाढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मध्यभारतातील पहिले वेबनार सिरीज सुरू करून आपल्या ख्यातीप्रमाणे रेनाॅयसन्स ने कौशल्य विकास व नवी गती या विद्यार्थांना देण्याचा कौतुकास्पद
शैक्षणिक उपक्रम निसर्वाथीपने सुरू करून लाॅकडाऊन परिस्थितीत सामाजिक कार्य साधले आहे.



0 Comments