जीवनावश्यक वस्तुची दुकाने वगळता बाकी सर्व आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद
दिपक भगत/बल्लारपुर(राज्य रिपोर्टर) : कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणुजन्य आजारावर नियंत्रण ठेवून व जनतेच्या गरजा लक्षात घेता मा. जिल्हाधिकारी चंद्रपुर यानी दिलेल्या दि 06 एप्रिल 2020 च्या आदेशानुसार जीवनावश्यक वस्तुंच्या विक्रीसह कापड, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, स्टेशनरी, मोबाइल, इलेक्ट्रिकल वस्तु अशा अन्य वस्तुची आस्थापना काही नियम व अटी सह मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी 07 एप्रिल ते 14 एप्रिल 2020 पर्यन्त 11 ते 2 वाजेपर्यंत विविध प्रकारच्या आस्थापनाना ठरवून दिलेल्या दिवस व वेळे नुसार दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती.
परंतु या उपरोक्त काळात जीवनावश्यक वस्तु वगळता इतर अन्य दुकाने/आस्थापना वर नागरिकांची अनावश्यक गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे व सोशल डिस्टेंस (सामाजिक दूरी) चे काटेकोर पणे पालन होत नसल्याचे दिसून आले त्यामुळे मा. जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात सुधारना करण्यात आली आहे. मा जिल्हाधिकारी यांच्या सुधारित आदेशानुसार जीवनावश्यक वस्तुची विक्री (दूध/ किराणा/भाजीपाला/अंडी/बेकरी/मास/ब्रेड/फळे/पशु खाद्य दुकाने) या प्रकारची सर्व आस्थापने दररोज सकाळी 7:00 ते 2:00 या वेळेत सुरु राहतील व अन्य सर्व प्रकारची सर्व आस्थापने शासनाच्या पुढील आदेशापर्यंत रदद् करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालया मार्फ़त निर्गमित केलेल्या आदेशात आहे.



0 Comments