बल्लारपुर शहरात नगर परिषदेची दंडात्मक कारवाई
बल्लारपुर, दि.,11/4/2020 (राज्य रिपोर्टर) : शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिंने राज्यात रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करून लॉकडाउन जाहीर केले आहे तसेच कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बल्लारपुर नगर परिषद वेगवेगळ्या उपाययोजना करून प्रयत्न करीत आहे त्याचप्रमाणे बल्लारपुर नगर परिषद, तहसील कार्यालय बल्लारपुर व पोलिस स्टेशन बल्लारपुर च्या वतीने कोरोना विषाणु पासून नागरिक दूर रहावे यासाठी अथक प्रयत्न करण्यात येत असून नागरिकांना वेळोवेळी सूचना देण्यात येत असल्या तरी अनेक नागरिक या सूचनांचे उल्लघन करतांना दिसून येतात अशा नागरिकावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे यानुसार प्रशासनाने नियुक्त केलेल्या डेपो विभागाच्या पथक प्रमुख श्री सुनिल पवार व टीम तसेच टेकड़ी विभाग प्रमुख श्री रविन्द्र जामुनकर व टीम यांनी पोलिस विभागाच्या मदतीने उज्वल ट्रेडर्स रेल्वे वार्ड, श्री नरेश काळे विद्यानगर वार्ड, श्री संजय ढोके व इतर बालाजी वार्ड यांचेवर दिनांक 10 एप्रिल 2020 ला प्रत्येकी 500 रु दंड आकारुन कारवाई करन्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने बल्लारपुर नगर परिषद महसूल प्रशासन व पोलिस विभागाच्या वतीने वस्ती विभाग, डेपो विभाग व टेकड़ी विभाग अशा 3 विभागामध्ये फिरते पथक नेमुन नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जात आहे तरी सर्व नागरिकांनी आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन श्री विपिन मुद्दा, मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपुर, मा.जे.बी.पोहनकर तहसीलदार बल्लारपुर व श्री शिवलाल भगत पोलिस निरीक्षक बल्लारपुर यांनी केले आहे.



0 Comments